Transfer : राज्य कर्मचाऱ्यांच्या बदल्या रद्द बाबतचा GR रद्द करणे संदर्भात , आत्ताच्या घडीची सर्वात मोठी अपडेट !

Spread the love

लाईव्ह मराठी पेपर , संगीता पवार : महाराष्ट्र राज्यातील जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्हाअंतर्गत व आंतरजिल्हा बदल्या रद्द हा शासन निर्णय रद्द करणेबाबत पुन्हा ऑनलाईन बदल्या चालू करणे संदर्भात राज्याचे मुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे यांना महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेच्या वतीने निवेदन सादर करण्यात आलेले आहे . या संदर्भात महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना यांच्या वतीने दिनांक 17 जुलै 2023 रोजी निवेदन प्रसिद्धी पत्रकांच्या माध्यमातून जाहीर करण्यात आले आहेत .

शासन आदेश दिनांक 21 जून 2023 नुसार जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्हाअंतर्गत व आंतरजिल्हा बदल्या रद्द करण्याबाबत शिक्षण विभागाने ग्रामविकास विभागाला आदेशित केले आहे . जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्हा अंतर्गत व आंतर जिल्हा बदल्या या पुढे रद्द अशा प्रकारच्या जाचक अटी घालून शिक्षण विभागाने शासन निर्णय काढलेला आहे . यामुळे महाराष्ट्रातील जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे .

सन 2017 ते 2022 मध्ये जिल्हाअंतर्गत व अंतर जिल्हा बदल्यामध्ये आजपर्यंत हजारो कोटींचा भ्रष्टाचार वाचला आहे . या सर्व बदल्या पारदर्शक व भ्रष्टाचार मुक्त होत होत्या . बदल्या बंद चा घेतलेला निर्णय आकारणीय आहे . शिक्षकांचे मानसिक खच्चीकरण करणार आहे , दिनांक 21 जून 2023 चा शिक्षण विभागाने घेतलेला निर्णय चुकीचा आहे . शिक्षकांच्या बदल्या ह्या भ्रष्टाचार मुक्त होत आहेत . उलट बदल्या बंद केल्या तर बदल्या कराव्या म्हणून भ्रष्टाचार चालू होईल , त्याचबरोबर तक्रारी बदल्या मध्येही पदस्थापना देण्यासाठी खूप मोठी रक्कम घेतली जाईल .

हे पण वाचा : कर्मचाऱ्यांसाठी मोठी खुशखबर ! माहे जुले पासून कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्ता मध्ये वाढ , सरकारने घेतला निर्णय !

वर्षानुवर्षे दुर्गम व गैरसोयीच्या ठिकाणी असलेले शिक्षक तक्रार करणारे लोक तयार करून , तक्रारी करायला लावतील . व पैसे देऊन चांगल्या ठिकाणी पदस्थापना करून घेतील . त्यामुळे बदल्या कोणत्याही परिस्थितीत बंद करू नये , आपसी बदल्या तक्रारी बदल्या मध्ये खूप मोठा भ्रष्टाचार होत आला आहे . त्यामुळे आपसी बदल्या बंद करण्यात आल्या होत्या . व ऑनलाइन बदल्या चालू करण्यात आल्या होत्या , दिनांक 21 जून 2023 रोजी काढलेल्या शासन निर्णयानुसार आंतरजिल्हा बदल्या तर कायमच्याच बंद करीत असून , जिल्हांतर्गत बदल्या तसेच दिनांक 21 जून 2023 रोजीचा शासन निर्णय रद्द करून जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्हा अंतर्गत व आंतर जिल्हा बदलांची पूर्वीचे आदेश कायम करावेत ही विनंती राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन सादर करण्यात आलेली आहेत .

आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक- शिक्षकेतर कर्मचारी त्याचबरोबर सेवानिवृत्त पेन्शनधारक /कुटुंब निवृत्तीवेतनधारक असाल तर व्हाट्सअप ग्रुपमध्ये जॉईन व्हा !

Leave a Comment