धक्कादायक वृत्त : प्रशासनांकडुन राज्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या नियमबाह्य बदल्या , प्रशासनांकडून बदलीची मोठी कार्यवाही !

Spread the love

लाईव्ह मराठी पेपर , प्रणिता पवार : सध्या महाराष्ट्र राज्य शासन सेवेतील अधिकारी / कर्मचाऱ्यांचे बदलीचे प्रक्रिया सुरु आहेत . सध्या राज्यातील अधिकारी संवर्गाच्या बदली सुरु आहेत , तसेच जिल्हा परिषदेमधील अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या बदली प्रक्रिया पुर्ण झालेली आहे . काही विभागातील बदली प्रक्रिया संथ गतिने प्रक्रिया सुरु आहे . यांमध्येच आता प्रशासनांकडून कर्मचाऱ्यांच्या नियमबाह्य बदल्या करण्यात आल्या आहेत .

त्याचबरोबर अनेक कर्मचाऱ्यांचे दोन वर्षांपेक्षा कमी कालावधी असून देखिल बदली करण्यात आलेली आहेत , शिवाय बदलीचे ठिकाण हे एका कार्यक्षेत्रांमधून दुसऱ्या कार्यक्षेत्रांमध्ये बदली करण्यात आलेली आहेत . तसेच दिव्यांग , विधवा , अपंग कर्मचाऱ्यांच्या बाबतीत बदली अधिनियमानुसार कोणतीही बदली सुट न देता अशा कर्मचाऱ्यांचे देखिल नियतकालिका बदल्या करण्यात आलेल्या आहेत .

महाराष्ट्र राज्यातील आदिवासी विकास आश्रमशाळा अंतर्गत कार्यरत शिक्षक व कर्मचारी यांच्या गैरसोयीच्या व अन्यायकारक नियतकालिका बदल्या करण्यात आलेल्या आहेत . यांमध्ये सन 2022-23 मधील नियतकालिक बदल्या या कर्मचाऱ्यांकडून विकल्प भरुन घेतले परंतु विकल्पानुसार एका प्रकल्पातून दुसऱ्या प्रकल्पात रिक्त जागा उपलब्ध असूनही अत्यंत गैरसोयीच्या बदल्या करण्यात आलेल्या आहेत .

हे पण वाचा : राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना दि.01 एप्रिल 2023 पासून सुधारित लाभ , सविस्तर शासन निर्णय पाहा !

यांमध्ये महिला , दिव्यांग कर्मचारी ,गंभीर आजार असणारे कर्मचारी व ज्यांच्या सेवानिवृत्तीला 2 वर्षापेक्षाही कमी कालावधी शिल्लक आहे , अशा सर्व कर्मचाऱ्यांच्या प्रकल्पाबाहेर व अत्यंत गैरसोयीच्या बदल्या करण्यात आलेल्या आहेत .आता सदर गैरसोयीच्या व अन्यायकारक नियतकालिक बदल्या रद्द करण्यात यावे याकरीता काल दि.09.06.2023 रोजी आदिवासी विकास आश्रमशाळा शिक्षक व कर्मचारी संघटनांकडून मा.अप्पर आयुक्त आदिवासी विकास विभाग ठाणे व आयुक्त आदिवासी विकास विभाग नाशिक आयुक्त कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढण्यात आला आहे .

आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच पेन्शनधारक कर्मचारी असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !

Leave a Comment