सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना शासन स्तरावरून सेवानिवृत्त वेतनाचा लाभ प्रदान करणे संदर्भात महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित ! GR दि.12.10.2023

Spread the love

Live marathipepar प्रणिता पवार [state employee GR ] : दिनांक 25.05. 1967 नंतर सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना शासन स्तरावरून सेवानिवृत्त वेतनाचा लाभ प्रदान करणे विषयी गठित अभ्यास समितीस मुदतवाढ देणे संदर्भात राज्य शासनाच्या सहकार पणन , वस्त्रोद्योग विभागाकडून दिनांक 12 ऑक्टोबर 2023 रोजी महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे .

राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती मधून दिनांक 25 मे 1967 नंतर सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना शासन स्तरावरून सेवानिवृत्त वेतनाचा लाभ प्रदान करण्याविषयी संदर्भाधिन शासन निर्णय नुसार अभ्यास समिती गठीत करण्यात आली आहे . सदर अभ्यास समिती शासनास अहवाल सादर करण्याची मुदत ही दिनांक 26 सप्टेंबर 2023 रोजी संपुष्टात आली असल्याने , सदर समितीला शासनास अहवाल सादर करण्यासाठी आणखीन तीन (03) महिने मुदतवाढ देण्याची बाब राज्य शासनाच्या विचाराधीन आहे .

यानुसार आता राज्य शासनाने असा निर्णय दिला आहे की , राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती मधून दिनांक 25 मे 1967 नंतर सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना शासन स्तरावरून सेवानिवृत्त वेतनाचा लाभ प्रदान करणे याविषयी धोरणात्मक निर्णय घेण्याकरिता संदर्भातील दिनांक 26 जून 2023 च्या शासन निर्णयानुसार गठित अभ्यास समितीला शासनास अहवाल सादर करण्याकरिता आणखीन तीन महिने म्हणजेच 25 डिसेंबर 2023 पर्यंत सदर शासन निर्णयान्वये मुदतवाढ देण्यात येत आहे .

सदर सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना शासन स्तरावरून सेवानिवृत्त वेदनाचा लाभ प्रदान करणे संदर्भात दिनांक 12 ऑक्टोबर 2023 रोजी निर्गमित सविस्तर शासन निर्णय पुढीलप्रमाणे पाहू शकता ..

आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.

Leave a Comment