Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ State Employee Shasasan Nirnay ] : कर्मचाऱ्यांच्या बाबतीत आत दिनांक 21 नोव्हेंबर 2023 रोजी महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला असून सदर शासन निर्णयानुसार परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजनेचा परतावा यासाठी अनुदान वितरीत करण्यात आलेले आहेत .
राज्यातील कृषी विद्यापीठे व त्यांच्याशी संलग्न अनुदानित संस्था मधील कर्मचाऱ्यांकडून जमा केलेल्या परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजनेचा परतावा यासाठी लेखाशिर्ष 83420141 अंतर्गत सन 2023-24 करीता एकुण अर्थसंकल्पित तरतुद रुपये 8,21,27,000/- पैकी 6,24,04,571/- इतके अनुदान वितरीत करण्यास राज्य शासनांकडून मंजुर देण्यात येत आहेत .
सदरचे अनुदान विद्यापीठास मंजूर करण्यात आलेले अनुदान महाराष्ट्र कृषी विद्यापीठे अधिनियम 1983 महाराष्ट्र कृषी विद्यापीठ परिनियम 1990 आणि महाराष्ट्र कृषी विद्यापीठ लेखा संहिता 1991 मधील तरतुदीप्रमाणे आणि प्रचलित शासन आदेश व विहीत कार्यपद्धतीनुसार सक्षम अधिकाऱ्यांची प्रशासकीय व वित्तीय मान्यता घेतल्यानंतर विहीत मर्यादेत खर्च करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत . तसेच सदरचा निधी हा केवळ अर्थसंकल्पीय तरतुद आहे किंवा अनुदान वितरीत केले आहे म्हणून खर्च करु नये असे सुचित करण्यात आलेले आहेत .
तसेच सदर अनुदान सन 2023-24 या आर्थिक वर्षातच खर्चासाठी सक्षम स्तरावर मान्यता घेवूनच खर्च करण्यात यावे असे सुचित करण्यात आलेले आहेत . तसेच सदरचा निधी हा इतर ठेवी , तसेच शासकीय कर्मचाऱ्यांसाठी परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजना , कृषी विद्यापीठे व त्यांच्याशी संलग्न अनुदानित संस्थामधील कर्मचाऱ्यांकडून जमा केलेल्या परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजनेच्या अंशदानाचा परतावा या लेखाशिर्ष खाली खर्च करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत .
या संदर्भात कृषी , पशुसंवर्धन , दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभागांकडून दिनांक 21.11.2023 रोजी निर्गमित करण्यात आलेला सविस्तर शासन निर्णय डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करावेत .
आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.