Live Marathipepar , संगिता पवार प्रतिनिधी : आज दिनांक 25 ऑक्टोंबर 2023 रोजी कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधीवरील व्याजाची रक्कम वितरीत करणेबाबत गृहनिर्माण विभागांकडून अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे .
सन 2023-24 या आर्थिक वर्षांमध्ये महाराष्ट्र गृहनिर्माण मंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधीवरील व्याजाची रक्कम वितरीत करणेबाबत , शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे . यांमध्ये नमुद करण्यात आलेले आहेत कि , महाराष्ट्र गृहनिर्माण मंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधींवरील व्याज ( अनिवार्य ) व्याज या लेखाशिर्षाखाली वित्तीय वर्ष 2023-24 या आर्थिक वर्षांकरीता रुपये 28,45,39,000/- रुपये इतकी अर्थसंकल्पीय तरतुद करण्यात आली आहे .
वित्त विभागांकडून सदर एकुण तरतुदीपैकी 50 टक्के म्हणजेच रुपये चौदा कोटी बावीस लक्ष एकोणसत्तर हजार पाचशे फक्त इतका निधी वितरीत करण्यात आला आहे . वित्तीय वर्ष 2023-24 करीता खर्चासाठी उपलब्ध करुन देण्यात आलेली रुपये चौदा कोटी बावीस लक्ष एकोणसत्तर हजार पाचशे फक्त इतकी रक्कम पुस्तकी समायोजनाने म्हाडास उपलब्ध करुन देण्यात येत आहे .
वित्त नियंत्रक महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण यांनी उपलब्ध प्राप्त तरतुदीमधून अत्यंत आवश्यक व अनिवार्य खर्च करावा . तसेच मंजुर अनुदानापेक्षा सदर खर्च जास्त होणार नाही याची खबरदारी घ्यावी अशा सुचना देण्यात आलेल्या आहेत . सदर बाबीबर होणारा खर्च हा लेखाशिर्षाखाली खर्ची टाकण्यात येवून तो सन 2023-24 वर्षाच्या मंजूर अनुदानातून भागविण्यात यावा असे नमुद करण्यात आलेले आहेत .
या संदर्भातील गृहनिर्माण विभागांकडून निर्गमित करण्यात आलेला सविस्तर शासन निर्णय पुढीलप्रमाणे पाहु शकता ..
आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.