लाईव्ह मराठी पेपर , बालाजी पवार : महाराष्ट्र राज्य शासकिय कर्मचारी संदर्भात आज दि.21 जून 2023 रोजी अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे . सदर शासन निर्णयान्वये राज्य कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्ती नंतर लाभ मंजुर करणे संदर्भात मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे . सदरचा शासन निर्णय हा राज्य शासनांच्या कृषी पशुसंवर्धन ,दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभागाकडून दि.21.06.2023 रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे .
दिनांक 01 नोव्हेंबर 2005 रोजी किंवा त्यांनतर नियुक्त झालेल्या व परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजना / राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणाली लागु असलेल्या महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ व अधिनस्त महाविद्यालये / प्रक्षेत्र /संस्था सेवेत असणाऱ्या कर्मचाऱ्यांना सेवेत असताना मृत्यु झाल्यास त्यांच्या कुटुंबाला कुटुंब निवृत्तीवेतन आणि मृत्यु उपदान त्याचबरोबर रुग्णता सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्याला रुग्णता निवृत्तीवेतन आणि सेवा उपदान लागू करणेबाबत मोठा निर्णय राज्य शासनांकडून घेण्यात आला आहे .
त्याचबरोबर सदर कुटंब निवृत्तीवेतनधारकास व रुग्णता निवृत्तीवेतनधारकास म.ना.सेवा नियम 1982 मधील तरतुदीप्रमाणे कुटुंब निवृत्तीवेतन / रुग्णता निवृत्तीवेतन लागु होणार आहे .तसेच विद्यापी सेवेतुन निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्ती उपदान सदर शासन निर्णयान्वये लागु करण्यात येत आहेत .
दिनांक 01.11.2005 रोजी ते या शासन निर्णयाच्या दिनांकापर्यंत मृत्यु पावलेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबास मृत्यु उपदान , कुटुंब निवृत्तीवेतनाची थकबाकी तसेच नियमित कुटुंब निवृत्तीवेतन मिळण्यासाठी सदर शासन निर्णयासोबतचा नमुना -3 मधील विकल्प कार्यालय प्रमुखाकडे सादर करावा लागणार आहे . त्यानुसार कुटुंब निवृत्तीवेतनधारकास त्याला मिळालेल्या सानुग्रह अनुदानाची रक्कम व परिभाषित निवृत्तीवेतन योजना / राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणाली अंतर्गत शासनाच्या अंशदानाची व्याज / लाभांशासह रक्कम समायोजित करण्याच्या अटीवर कुटुंब निवृत्तीवेतनाचा लाभ अनुज्ञेय असणार आहे , तसेच सदर रक्कम समायोजित झाल्यानंतर कुटुंब निवृत्तीवेतनधारकास नियमितपणे कुटुंब निवृत्तीवेतन अनुज्ञेय असणार आहे .
या संदर्भात कृषी , पशुसंवर्धन , दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभागांकडून दि.21 जुन 2023 रोजी निर्गमित करण्यात आलेला GR डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करावेत ..
आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक व कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !