Live marathipepar प्रणिता पवार प्रतिनिधी : राज्य शासन सेवेतील अधिकारी / कर्मचारी यांचे वेतन व भत्ते अदा करणे संदर्भात राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागाकडून दिनांक 11 ऑक्टोबर 2023 रोजी अत्यंत महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे .
माननीय मंत्रिमंडळ यांच्या दिनांक 31 मार्च 2022 च्या बैठकीमध्ये जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा प्रशासन योजना बंद करणे ऐवजी राज्य शासनाकडून 100% राज्य योजना म्हणून पुढील पाच वर्ष म्हणजेच दिनांक 1 एप्रिल 2022 ते दिनांक 31 मार्च 2027 पर्यंत पूर्वीप्रमाणे सुरू ठेवण्याबाबत , निर्णय घेण्यात आला आहे . जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा प्रशासन योजने करिता दिनांक 1 एप्रिल 2022 पासून 15 पदा ऐवजी 08 पदे निश्चित करण्यात आले असून , उर्वरित पदावरील अधिकारी / कर्मचारी यांच्या सेवा त्यांच्या मूळ आस्थापनेवर प्रत्यार्पित करण्याबाबत निर्णय घेण्यात आलेला आहे .
राज्य शासनाद्वारे 05 कोटी 68 लाख 41 हजार 200 इतका निधी आर्थिक वर्ष 2023-24 मधील अर्थसंकल्पीत तरतुदी मधून जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा प्रशासनामधील अधिकारी व कर्मचारी यांचे वेतन व भत्ते अदा करण्याकरिता संबंधित मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांना आहरण व संवितरण अधिकारी म्हणून वितरित करण्यात येत आहेत .
सन 2023-24 करिता जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेमध्ये अधिकारी व कर्मचारी यांचे वेतन व भत्ते अदा करण्याकरिता संबंधित मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांना आहरण व संवितरण अधिकारी म्हणून अर्थसंकल्पीय वितरण प्रणालीवर निधी उपलब्ध करून देण्याची बाब राज्य शासनाच्या विचाराधीन होती . यानुसार जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा प्रशासनामधील अधिकारी व कर्मचारी यांचे वेतन व भत्ते आदा करण्याकरिता आवश्यक प्रतिमहा वेतनासाठी सरासरी खर्च व त्यांच्याकडे शिल्लक निधी विचारात घेऊन सन 2023- 24 करिता जिल्हा ग्रामीण विकास केंद्र मधील अधिकारी व कर्मचारी यांचे वेतन व भत्ते अदा करण्याकरिता 06 कोटी 25 लाख इतका निधी संबंधित मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांना आहरण व संवितरण अधिकारी म्हणून अर्थसंकल्पीत वितरण प्रणालीवर खाली नमूद विवरण पत्रानुसार वितरित करण्यात येत आहे ..
यासंदर्भात ग्रामविकास विभागाकडून दिनांक 11 ऑक्टोबर 2023 रोजी निर्गमित करण्यात आलेला , अनुदान वितरण संदर्भातील सविस्तर शासन निर्णय डाऊनलोड करण्याकरिता खालील लिंकवर क्लिक करावेत .
आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.