लाईव्ह मराठी पेपर , संगिता पवार : राज्य शासन सेवेतील या कर्मचाऱ्यांच्या बाबतीत आज दिनांक 14 ऑगस्ट 2023 रोजी महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे , सदर शासन निर्णयान्वये पुणे व सोलापुर जिल्हांतर्गत ग्रामीण रुग्णालयातील 102 अस्थायी पदे पुढे चालु ठेवण्यास मुदतवाढ देण्यात आलेली आहे .
राज्य शासनांच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या दिनांक 14 ऑगस्ट 2023 रोजीच्या शासन निर्णयानुसार , विविध आरोग्य संस्थामधील अस्थायी पदांना दिनांक 01.09.2022 ते दिनांक 28.02.2023 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती सदर मुदवाढ दिनांक 28.02.2023 रोजी संपुष्टात आल्याने आरोग्य सेवा आयुक्तालयाने उपसंचालक आरोग्य सेवा पुणे मंडळ पुणे यांच्या अधिपत्याखालील पुणे व सोलापुर जिल्हामधील ग्रामीण रुग्णालयातील 102 अस्थायी पदांना मुदतवाढ देण्याबाबतचा प्रस्ताव शासनास सादर केला आहे .
तसेच सदर शासन निर्णयान्वये उपसंचालक आरोग्य सेवा पुणे मंडळ यांच्या अधिपत्याखालील पुणे व सोलापुर जिल्ह्यामधील ग्रामीण रुग्णालयातील 102 अस्थायी पदांना दिनांक 01.03.2023 ते दिनांक 31.08.2023 पर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे . आयुक्तालय आरोग्य सेवा मुंबई यांनी सर्व पदांचा आढावा घेवून सुधारित आकृतीबंध शासन मान्यतेकरीता तात्काळ सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत . तसेच यानंतर सुधारित आकृतीबंध निश्चित करण्याकरीता वारंवार कालावधी वाढवून मिळणार नाही याची दक्षता घेण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत .
तसेच सदर अस्थायी पदांचे वेतन व भत्यावरील खर्च त्या- त्या शासन निर्णयात नमुद लेखाशिर्षातुन 2023-24 या वर्षाकरीता मंजूर निधीतीन भागविण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत .सदरचा शासन निर्णय हा वित्त विभागाच्या क्र.पदनि-2016 दिनांक 08.02.2023 च्या शासन निर्णयान्वये प्रशासकीय विभागांना प्रदान केलेल्या अधिकारानुसार निर्गमित करण्यात येत आहेत .
सदरचा सार्वजनिक आरोग्य विभागांकडून दि.14.08.2023 रोजी निर्गमित करण्यात आलेला सविस्तर शासन निर्णय डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करावेत .
आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !