Spread the love

लाईव्ह मराठी पेपर , संगिता पवार : राज्य शासन सेवेतील अधिकारी कर्मचारी संदर्भात विभागीय पदोन्नती समितीचे गठन करण्याबाबत उच्च व तंत्र शिक्षण विभागांकडून महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे .

सामान्य प्रशासन विभागाच्या दिनांक 01.08.2019 रोजीच्या शासन निर्णयान्वये राज्य शासकीय अधिकारी व कर्मचारी यांना पदोन्नती देण्याकरीता अनुसरावयाच्या कार्यपद्धतीची एकत्रित मागदर्शक तत्ते निर्गमित केली आहेत . सदर शासन निर्णयतील परिच्छेद अ येथे 6 व्या वेतन आयोगानुसार ज्या पदांचे ग्रेड वेतन रुपये 7,599/- किंवा त्यापेक्षा कमी आहे अशा सर्व गट अ मधील पदांसाठी पदोन्नतीबाबत / पदोन्नतीचा मानीव दिनांक देण्यासाठी नियुक्ती प्राधिकाऱ्यास शिफाासर करण्याकरीता विभागीय पदोन्नती समितीचे गठन करण्याची तरतुद करण्यात आली आहे .

 त्या अनुषंगाने तंत्रशिक्षण संचालनालय यांच्या अधिपत्याखालील सर्व कार्यालये / संस्था या मधील 6 व्या वेतन आयोगानुसार , ज्या पदांचे ग्रेड वेतन रुपये 7,599/- रुपये किंवा त्यापेक्षा कमी आहे अशा ( आस्थापना मंडळाच्या कक्षेबाहेरील गट अ संवर्गातील पदांसाठी पदोन्नती / पदोन्नतीचा मानीव दिनांक देण्याबाबत नियुक्ती प्राधिकाऱ्यांस शिफारस करण्याकरीता खालील प्रमाणे समितीचे गठन करण्यात आलेले आहेत .

हे पण वाचा : वयाच्या 50 वर्षे / 15 वर्षे सेवा पुर्ण झालेल्या अधिकारी / कर्मचाऱ्यांसाठी विधानसभेतुन आत्ताची मोठी अपडेट !

यांमध्ये उपर मुख्य सचिव / प्रधान सचिव उच्च व तंत्र शिक्षण विभाग मंत्रालय मुंबई हे अध्यक्ष असणार आहेत , तर संचालक तंत्र शिक्षण संचालनालय महाराष्ट्र राज्य मुंबई हे सदस्य, उप सचिव महाविद्यालयीन शिक्षण उच्च व तंत्र शिक्षण विभाग मंत्रालय मुंबई हे सदस्य तर उप सचिव तंत्र शिक्षण उच्च व तंत्र शिक्षण विभाग मंत्रालय मुंबई हे सदस्य सचिव असणार आहेत .

सदर पदोन्नती संदर्भातील समितीचे गठन करणेबाबतचा दिनांक 04 ऑगस्ट 2023 रोजीचा सविस्तर शासन निर्णय पुढीलप्रमाणे पाहु शकता ..

आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *