लाईव्ह मराठी पेपर, प्रणिता पवार : महाराष्ट्र राज्य शासकीय अधिकारी व कर्मचारी यांच्या संदर्भात आज दिनांक 21 जुलै 2023 रोजी मराठी भाषा विभाग मार्फत अत्यंत महत्त्वपूर्ण शासन निर्णय ( Gr ) निर्गमित करण्यात आलेला आहे .
महाराष्ट्र राज्य शासन सेवेतील अधिकारी / कर्मचारी यांच्यासाठी विहित केलेल्या परीक्षांसाठी नियुक्त केलेली सर्व एतदर्थ मंडळे बरखास्त करण्यासंदर्भात मराठी भाषा विभाग मार्फत शासन निर्णय निर्गमित करून नमूद करण्यात आले आहे की , मराठी ,हिंदी आणि मराठी टंकलेखन व लघुलेखन परीक्षांसाठी निर्माण करण्यात आलेली सर्व एतदर्थ मंडळी आणि या मंडळावर नियुक्त करण्यात आलेले अध्यक्ष व शासकीय सदस्य यांची नेमणूक रद्द करण्यात येत आहेत..
यानुसार याचा एतदर्थ मंडळाकडून घेण्यात येत असलेल्या परीक्षा यापुढे पुढील नावाने संबोधण्यात येतील . यामध्ये भाषा संचालनामार्फत घेण्यात येणारी मराठी भाषा परीक्षा तसेच भाषा संचालना मार्फत घेण्यात येणारी हिंदी भाषा परीक्षा तसेच भाषा संचलनयामार्फत घेण्यात येणारी मराठी लघुलेखन ,मराठी टंकलेखन परीक्षा या नावाने संबोधित करण्यात येणार आहेत..
वरील नमूद सर्व परीक्षांच्या आयोजन संदर्भात भाषा संचालक हे नियंत्रक म्हणून कर्तव्य व जबाबदाऱ्या पार पाडणार आहेत सर्व परीक्षांचे वेळापत्रक जाहीर करणे, अभ्यासक्रम निश्चित करणे ,उमेदवाराकडून अर्ज मागविणे ,अर्जांची छाननी करणे, प्रश्नपत्रिका /उत्तरपत्रिका यांची छपाई करणे, गुण देण्याची कार्यपद्धती निकाल जाहीर करून उमेदवारांना कळवणे इत्यादी परीक्षांच्या नियोजना संदर्भात सर्व बाबींची परीक्षा जबाबदारी भाषा संचालक भाषा संचालनालय यांची असणार आहे . सदर कर्तव्य जबाबदाऱ्या पार पाडण्याची त्यांना अनुभवी तज्ञ व्यक्ती शिक्षक यांची मदत घेता येणार आहे..
मराठी भाषा विभागाकडून 21 जुलै 2023 रोजी निर्गमित शासन निर्णय पुढीलप्रमाणे पाहू शकता…
आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी ,शिक्षक – शिक्षकेतर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी त्याचबरोबर पेन्शनधारक कुटुंब निवृत्तीवेतनधारक असाल तर व्हाट्सअप ग्रुप मध्ये जॉईन व्हा !
- SSC / HSC महाराष्ट्र राज्य फेब्रु/ मार्च बोर्ड परीक्षा 2024 वेळापत्रक प्रसिद्ध ; पाहा / डाऊनलोड करा PDF
- राज्यात दि.27 ते 30 नोव्हेंबर पर्यंत राज्यातील या 09 जिल्ह्यात पावसाची शक्यता ; तर दि 01 ते 04 डिसेंबर काळात अवकाळी पावसाची शक्यता !
- एक्झिट पोलच्या सर्व्हेनुसार निवडुन येणाऱ्या संभाव्य आमदारांची नावे ; या 10 अपक्ष आमदारांचा देखिल समावेश .
- शिक्षकांची वाढीव पदे समायोजन करणेबाबत , महत्वपुर्ण परिपत्रक निर्गमित !
- इ.10 वी / 12 वी बोर्ड परीक्षा वेळापत्रक जाहीर ; जाणून घ्या तोंडी व लेखी परीक्षा वेळापत्रक !