Spread the love

शासन निर्णय ( GR ) : राज्यातील शासकीय कर्मचाऱ्यांच्या वैद्यकीय खर्चाच्या प्रतिपुर्तीच्या मंजुरीबाबत , प्रतिपुर्तीच्या अनुज्ञेयतेची कमाल मर्यादा व मंजुरीच्या अधिकारांत सुधारणा करण्याबाबत राज्य शासनांच्या सार्वजनिक बांधकाम विभागांकडून दिनांक 22 ऑगस्ट 2023 रोजी अत्यंत महत्वपुर्ण सुधारित शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे .

शासकीय अधिकारी / कर्मचारी व त्यांच्या कुटुंबियांना महाराष्ट्र राज्य सेवा ( वैद्यकीय सेवा ) नियम 1961 व त्यानुषंगाने शासनाने वेळोवेळी निर्गमित केलेले शासन निर्णय यामधील तरतुदींच्या अधीन राहुन वैद्यकीय खर्च प्रतिपुर्ती मंजूर करण्याचे निर्देश आहेत . राज्य शासनांने वैद्यकीय खर्च प्रतिपुर्तीच्या प्रस्तावांची प्रलंबित प्रकरणे लक्षात घेता , सार्वजनिक आरोग्य विभागाने दिनांक 17.01.2023 च्या शासन निर्णयान्वये , महाराष्ट्र राज्य सेवा नियम 1961 व त्यानंतर वेळोवेळी निर्गमित केलेले शासन निर्णयामधील अटी व शर्तींच्या अधीन राहून ..

विहीत केलेले विभागप्रमुख व प्रादेशिक विभागप्रमुख यांच्या वित्तीय अधिकारांमध्ये बदल केले आहेत . राज्य शासनांच्या दिनांक 17.01.2023 च्या शासन निर्णयानुसार सुधारित केल्याप्रमाणे वैद्यकीय खर्च प्रतिपुर्तीच्या मंजुरीचे वित्तिय अधिकार प्रदान करण्याची बाब राज्य शासनाच्या विचाराधीन होती .

यानंतर आता राज्य शासनांकडून असा निर्णय घेण्यात आला आहे कि , दि.17.01.2023 रोजीच्या शासन निर्णयामधील परिच्छेद 04 मध्ये नमुद केल्यानुसार सार्वजनिक बांधकाम विभाग अंतर्गत क्षेत्रिय कार्यालयांमध्ये अधिकारी / कर्मचारी यांच्या निव्वळ वैद्यकीय खर्च प्रतिपुर्तीच्या मंजुरीकरीता विभागप्रमुख व प्रादेशिक प्रमुख घोषित करण्यास व त्यांच्या समोर विहीत केलेल्या वित्तिय मर्यादेत प्रतिपुर्तीचे अधिकार प्रदान करण्यास सदर शासन निर्णयान्वेय मान्यता देण्यात येत आहे .

यांमध्ये सक्षम प्राधिकारी , सक्षम प्राधिकारी यांचे पदनाम व शासन निर्णय दिनांक 17.01.2023 नुसार देण्यात आलेले अधिकार बाबतचे तपशिल पुढीलप्रमाणे आहे .

या संदर्भात राज्य शासनांच्या सा.बां.विभागांकडून दिनाक 22.08.2023 रोजी निर्गमित करण्यात आलेला सविस्तर शासन निर्णय पुढीप्रमाणे पाहु शकता..

आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच इतर पात्र कर्मचारी त्याचबरोबर सेवानिवृत्त पेन्शनधारक  / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *