जुलै महिन्यात राज्य कर्मचाऱ्यांना तिहेरी आर्थिक लाभ ; जाणून घ्या सविस्तर !

Spread the love

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ State Employee Three Benefit In Jully Month ] : राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांना माहे जुलै 2024 मध्ये तिहेरी आर्थिक लाभ मिळणार आहेत , ते कोणकोणते लाभ मिळतील ते पुढीलप्रमाणे पाहूयात ..

वाढीव 4 टक्के डी.ए लाभ : केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांना माहे जानेवारी 2024 पासून 4 टक्के डी.ए वाढ लागु करण्यात आली आहे , सदर केंद्र सरकारच्या धर्तीवर राज्यातील कर्मचाऱ्यांना डी.ए वाढीचा निर्णय आचारसंहितामुळे लांबणीवर गेला आहे . परंतु जसे कि निवडणूक कामकाज पुर्ण होतील , तसेच राज्यातील कर्मचाऱ्यांना डी.ए वाढीचा लाभ लागु करण्यात येणार आहे .

माहे जुन महिन्यापर्यंत लोकसभा निवडणूकाचे कामकाज सुरु असणार आहेत , निवडणूकीचे कामकाज ( आचार संहिता पुर्ण झाल्याच्या नंतर ) पुर्ण झाल्याच्या नंतर जुन महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात डी.ए वाढीबाबतचा निर्णय निर्गमित होईल . तर जुन पेड इन जुलै महिन्यात डी.ए वाढीचा लाभ अनुज्ञेय करण्यात येईल .

डी.ए वाढ ही माहे जानेवारी 2024 पासून लागु करण्यात येणार असल्याने , माहे जानेवारी ते मे अशा एकुण 5 महिन्याचे डी.ए थकबाकी रक्कम अदा करण्यात येणार आहेत .सदरची डी.ए वाढ ही 4 टक्के असल्याने , राज्यातील कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे 50 टक्के दराने डी.ए वाढ लागु होईल .

माहे जुलै महिन्यात दरवर्षी राज्यातील कर्मचाऱ्यांना वार्षिक वेतनवाढ लागु करण्यात येते , यामुळे राज्यातील कर्मचाऱ्यांना माहे जुलै महिन्यात डी.ए वाढ , डी.ए फरक , तसेच वार्षिक वेतनवाढ अशा प्रकारे तिहेरी आर्थिक लाभ होणार आहे .

आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.

Leave a Comment