लाईव्ह मराठी पेपर , संगिता पवार : महाराष्ट्र राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचारी आणि सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना देय असलेल्या सातव्या वेतन आयोगाच्या थकबाकीच्या हप्त्यांचे प्रदान करण्याबाबत राज्य शासनांच्या वित्त विभागांकडून दि.24 मे 2023 रोजी अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे .
राज्यांमध्ये कोविड -19 या विषाणुच्या साथीमुळे उद्भवलेली परिस्थिती व त्यामुळे महसूल जमेवर झालेला प्रतिकुल परिणाम विचारात घेवून शासन निर्णय वित्त विभाग दि.09 मे 2022 नुसार राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारकांना दिनांक 01 जुलै 2021 रोजी देय असलेल्या सातव्या वेतन आयोगाच्या थकबाकीच्या तिसऱ्या हप्त्याचे प्रदान दिनांक 09 मे 2022 रोजीच्या शासन निर्णयान्वये करण्यात आले आहे . त्याचबरोबर सदर शासन निर्णयामध्ये उर्वरित देय असलेल्या हप्त्याचे प्रदान करण्यासंदर्भात कोणताही निर्णय घेण्यात आला नव्हता . या पार्श्वभुमीवर थकबाकीच्या उर्वरित हप्त्यांच्या प्रदानासंबंधीचा प्रश्न शासनाच्या विचाराधीन होता .
सदर शासन निर्णयानुसार आता शासन आता असे आदेश देत आहे कि ,राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचारी आणि सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना दिनांक 01 जुलै 2022 रोजी व देय असलेल्या सातव्या वेतन आयोगाच्या अनुक्रमे वेतन आणि निवृत्तीवेतनाच्या थकबाकीच्या चौथ्या हप्त्यांची रक्कम सदर निर्णयांमध्ये नमुद केल्याप्रमाणे भविष्य निधी योजनेच्या खात्यात जमा करण्याचे अथवा रोखीने अदा करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत .
यानुसार निवृत्तीवेतनधारकांना निवृत्तीवेतनाच्या थकबाकीच्या चौथ्या हप्त्याची रक्कम माहे जुन 2023 च्या निवृत्तीवेतनासोबत रोखीने अदा करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत . तर राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना थकबाकीच्या चौथ्या हप्त्याची रक्कम माहे जून 2023 च्या वेतनासोबत अदा करण्याचे आदेश देण्यात आले आहे त. त्याचबरोबर राज्यातील जिल्हा परिषदा , शासन अनुदानित शाळा आणि इतर सर्व शासन अनुदानित संस्थांमधील पात्र कर्मचाऱ्यांच्या थकबाकीच्या चौथ्या हप्त्याची रक्कम माहे जून , 2023 च्या वेतनासोबत अदा करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत .
ज्या कर्मचाऱ्यांना भविष्य निर्वाह निधी योजना लागु आहे अशा कर्मचाऱ्यांच्या थकबाकीची रक्कम त्यांच्या भविष्य निर्वाह निधी योजनेच्या खात्यात जमा करण्यात यावी आणि राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना अथवा परिभाषित अंशदायी निवृत्तीवेतन योजना लागू असलेल्या कर्मचाऱ्यांच्या थकबाकीची रक्कम रोखीने अदा करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत .
या संदर्भातील वित्त विभागाकडून दि.24 मे 2023 रोजी निर्गमित करण्यात आलेला सविस्तर शासन निर्णय डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करावे .
आपण राज्य / केंद्र सरकारी तसेच निमसरकारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी असाल तर Whatsapp ग्रूपमध्ये सामिल व्हा !