Spread the love

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ state employee technology & instrument Purchase shasan nirnay ] : राज्य शासन सेवेमध्ये काम करणे सुलभ व्हावे याकरीता राज्य शासकीय सेवेतील अपंग कर्मचाऱ्यांना सहायक तंत्रज्ञान / उपकरणे उपलब्ध करुन दिले जाते , या संदर्भात राज्य राज्यातील जिल्हा परिषदांमध्ये कार्यरत असणाऱ्या सर्व दिव्यांग अधिकारी / कर्मचाऱ्यांना तंत्रज्ञान / उपकरणे खरेदी करण्यासाठी ग्रामविकास विभागांकडून दिनांक 28 जुन 2024 रोजी अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे  .

सदर शासन निर्णयांमध्ये नमुद करण्यात आले आहेत कि , मा.न्यायालयोन यापुर्वी दिलेल्या आदेश त्याचबरोबर अपंग अधिनियम 1995 व दिव्यांग अधिनियम 2016 विचारात घेता , जिल्हा परिषदांमध्ये कार्यरत असणाऱ्या सर्व दिव्यांग अधिकारी / कर्मचाऱ्यांना सहाय्यभूत ठरतील अशी साधने उपलब्ध करुन द्यावयाची आहेत , मा.उच्च न्यायालयांमध्ये दाखल असलेले प्रकरणे हे फक्त शिक्षकांपुरते मर्यादित असले तरी ..

जेव्हा दिव्यांग अधिकारी / कर्मचाऱ्यांना 1995 व 2016 च्या अधिनियमानुसार साहीत्य / साधने उपलब्ध करुन देण्याचा प्रश्न उपस्थित होतो , तेव्हा हा प्रश्न केवळ शिक्षकांपुरता मर्यादित रहात नाही . जिल्हा परिषदांमध्ये कार्यरत असणाऱ्या सर्व दिव्यांग अधिकारी / कर्मचाऱ्यांचा प्रश्न ठरतो , अशा दिव्यांग अधिकारी / कर्मचाऱ्यांना जिल्हा परिषदेमध्ये काम करीत असताना वा जिल्हा परिषदेची सेवा बजावित असताना ती सहजपणे व सुलभरित्या करता यावी , यासाठी त्यांना त्यांच्या अपंगात्वानुसार आवश्यक ती साधने / साहित्य पुरविण्याची जबाबदारी संबंधित कार्यालयाची असणार आहे , असे नमुद करण्यात आलेली आहे .

त्यामुळे जिल्हा परिषदेतील सर्व दिव्यांग कर्मचाऱ्यांना सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने वेळोवेळी निर्गमित केलेल्या शासन निर्णयानुसार विहीत केलेली आधुनिक तंत्रज्ञान / उपकरणे उपलब्ध करण्यासाठी कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत .

या संदर्भातील ग्राम विकास विभागांकडून दिनांक 28 जुन 2024 रोजी निर्गमित करण्यात आलेला सविस्तर शासन निर्णय पुढीलप्रमाणे पाहु शकता ..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *