Spread the love

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ State Education Department 25,000 Employee OPS Scheme ] : राज्यातील शिक्षण क्षेत्रांमध्ये कार्यरत सुमारे 25,000 शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शनचा लाभ लागु करणेबाबत , सर्वोच्च न्यायालयांने मोठा दिलासादायक निर्णय दिला आहे , यासंदर्भात राज्य सरकार देखिल सकारात्मक असल्याचे दिसून येत आहेत .

काल दिनांक 10 जानेवारी 2024 रोजी राज्यातील खाजगी अनुदान प्राप्त कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन लागु करणेबाबतच्या याचिकेवर सुनावणी होती . या याचिकेमध्ये नमुद करण्यात आले होते , कि राज्यातील अशा शैक्षणिक संस्था ज्यांना सन 2005 नंतर अनुदान प्राप्त झालेले आहेत , परंतु ज्यांची भरती ही सन 2005 पुर्वीच्या आहेत . अशा कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन बहाल करणेबाबत कर्मचाऱ्यांनी सर्वोच्च न्यायालयांमध्ये याचिका दाखल करण्यात आलेली आहे .

यावर राज्य सरकार सदर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन बहाल करण्यास सकारात्मक असल्याचे सांगितले असल्याने , आता राज्यातील सुमारे 25,000‍ शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन ( Old Pension ) बहाल होण्याची आशा होण्याची पल्लवित झालेली आहे . दिनांक 04 जानेवारी 2024 रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये राज्य शासनांने असा निर्णय घेतला कि , दिनांक 01.11.2005 नंतर रुजु झालेले परंतु भरती प्रक्रियाची जाहीरात ही 01.11.2005 पुर्वीची असेल अशा सर्व पात्र अधिकारी / कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन बहाल करण्याचा निर्णय घेतला आहे .

खाजगी अनुदानित शैक्षणिक संस्थामधील शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचा मुद्दा : राज्यातील खाजगी अनुदानित शैक्षणिक संस्था मधील शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी याचिका करताना नमुद करण्यात केली कि , शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे खाजगी अनुदानित शाळांमधील कर्मचाऱ्यांची नियुक्ती ही सन 2005 पुर्वीच झालेली आहे , परंतु अनुदान हे सन 2005 नंतर मिळाले आहे , परंतु नियुक्ती ही पुर्वीची असल्याने शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे जुनी पेन्शन प्राप्त करण्यास पात्र असल्याचा प्रश्न उपस्थित करण्यात आलेला होता .

सदर मुद्द्यांवर सर्वोच्च न्यायालयांत न्यायाधिशांनी थेट सांगितले कि , सदर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन बहाल करण्याचे श्रेय राज्य शासन घेईल का आम्ही घेवू , यावर राज्य शासनांने सकारात्मकता दर्शविल्याने , राज्यातील खाजगी अनुदानित संस्थामधील सन 2005 पुर्वी नियुक्ती झालेल्या सुमारे 25,000 शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना लवकरच जुनी पेन्शन बहाल होण्याची आशा पल्लवित झालेल्या आहेत .

आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *