Spread the love

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ state employee & Teacher – Non Teaching staff gr ] : महाराष्ट्र नागरी सेवा ( निवृत्तीवेतन ) नियम 1982 व वित्त विभागाकडील शासन निर्णयानुसार सेवानिवृत्त होणाऱ्या राज्य शासकीय अधिकारी / कर्मचारी आणि अनुदानित संस्थांमधील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांची निवृत्तीवेतन प्रकरणे संबंधित कार्यालय प्रमुख यांच्या मार्फत निवृत्तीवेतन वाहिनी या प्रणालीवर ऑनलाईन पद्धतीने व हस्तलिखिल नमुने भरुन घेवून सेवापुस्तकासह नागपुर यांच्याकडे मंजूरीस्तव सादर करण्यात येतात , असे नमुद करण्यात आलेले आहेत .

त्याचबरोबर निवृत्तीवेतन धारक यांच्यासाठी निवृत्तीवेतन वाहिनी आज्ञावलीमधील निवृत्तीवेतनधारकांच्या वैयक्तिक लॉगिनमध्ये उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत , त्याचबरोबर संबंधित आहरण व संवितरण अधिकारी यांनी त्यांच्या सेवार्थ लॉगिनमधील ई – लायब्ररी या टॅब मध्ये उपलब्ध करुन देण्यात आलेले ई – पीपीओ , ई – जिपीओ , ई – सीपीओ च्या पीडीएफ कॉपी ची मुद्रीत प्रत साक्षांकित करुन संबंधित निवृत्तीवेतन धारक यांना उपलब्ध करुन देणे बंधनकारक असणार आहेत .

ई-पीपीओ , ई – जिपीओ , ई – सीपीओ च्या अनुषंगाने आवश्यक त्या सुधारण महाराष्ट्र नागरी सेवा नियम ( निवृत्तीवेतन ) 1982 त्याचबरोबर नियम , 1968 मध्ये यथावकाश सुधारणा करण्यात येणार आहेत . तसेच आहरण व संवितरण अधिकारी यांनी सेवानिवृततीवेतन प्रकरण महालेखापाल कार्यालयास सादर करताना सेवानिवृत्त अधिकारी / कर्मचारी यांचा मोबाईल क्रमांक व ई-मेल आयडी अचुक नोंदवावा , जेणेकरुन महालेखापाल कार्यालयाकडून निवृत्तीवेतन प्रकरण मंजूर झाल्याबाबत निवृततीवेतनधारकाला एसएमएस पाठविणे शक्य होणार आहे .

वित्त विभागाच्या दिनांक 24 ऑगस्ट 2023 नुसार परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजना / राष्ट्रीय पेन्शन योजना अंतर्गत कर्मचाऱ्यांचा सेवा कालावधीत मृत्यु झाल्यास , त्यांचा कुटुंबियांना कुटुंब निवृत्तीवेतन आणि मृत्यु उपदान त्याचबरोबर रुग्णता सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्याला रुग्णता निवृत्तीवेतन आणि सेवानिवृत्ती उपदान , त्याचप्रमाणे शासन सेवेतुन निवृत्त झालेल्या / होणाऱ्या सेवानिवृत्ती उपदान प्रदान करण्यासाठी कार्यपद्धती विहीत करण्यात आलेली आहे .

सदरच्या कार्यपद्धतीनुसार दिनांक 01 जुन 2024 पासुन पुढे महालेखापाल महाराष्ट्र , नागपुर यांच्या कार्यालयाकडून प्रकरण मंजूर करण्यात आल्याच्या नंतर उपदानाच्या संदर्भात प्रदानाची कार्यवाही संबंधित आहरण व संवितरण अधिकारी यांच्या द्वारे न करता त्याऐवजी सदर कार्यवाही सहाय्यक अधिदान व लेखा अधिकारी ( निवृत्तीवेतन / शाखा ) उपर कोषागार अधिकारी ( निवृत्तीवेतन शाखा ) यांच्याकडून करण्यात येणार आहे .

या संदर्भातील वित्त विभागांकडून दिनांक 22 मे 2024 रोजी निर्गमित करण्यात आलेला सविस्तर शासन निर्णय डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करावेत .

शासन निर्णय (GR)

आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *