Spread the love

लाईव्ह मराठी , पेपर संगीता पवार : महाराष्ट्र राज्य शासन सेवेतील कर्मचाऱ्यांच्या आर्थिक वर्ष 2023-24 साठी आयकर कपात बाबतचे पसंती कळविण्याबाबत राज्य शासनाकडून दिनांक 29 मे 2023 रोजी अत्यंत महत्त्वपूर्ण शासन परिपत्रक निर्गमित करण्यात आलेला आहे .

आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये केंद्र सरकारच्या अर्थसंकल्पात आयकर कपातीमध्ये बदल करण्यात आले आहेत , आयकर विभागाच्या आयकर वसुलीचे नवीन सेक्शन 115 BAC नुसार आर्थिक वर्ष 2023- 24 च्या आयकर परीगणनेसाठी New Tax Regime व Old Tax Regime असे दोन प्रकार ठरवण्यात आले आहेत . त्याची वैशिष्ट्ये सदर शासन परिपत्रकामध्ये नमूद करण्यात आलेली आहे .

जुन्या आयकर प्रणालीनुसार 250,000/- रुपये पर्यंत उत्पन्न आयकर कपात NILL आहे . तर नवीन आयकर प्रणाली मध्ये 300,000/- रुपये पर्यंतचे उत्पन्नावर आयकर Nill आहे . त्याचबरोबर जुन्या आयकर प्रणाली मध्ये 250,000/- रुपये ते 5,00,000/- पर्यंतच्या उत्पन्नावर 5% आयकर कपातीचे दर आहे . तर नवीन आयकर प्रणालीनुसार 3,00,000/- रुपये ते 6,00,000/- रुपये पर्यंत उत्पन्नावर 5% आयकर कपातचे दर आहे .

हे पण वाचा : राज्य शैक्षणिक धोरणाच्या नविन आराखड्याची निर्मिती , शैक्षणिक यंत्रणेमध्ये मोठा बदल !

जुन्या आयकर प्रणालीनुसार व नवीन आयकर प्रणालीनुसार आयकर कपातीचे दर पुढील चार्टनुसार सविस्तर पाहू शकता ..

वरील चार्टनुसार योग्य आयकर प्रणालीचा पर्याय निवडून लेखी स्वरुपात आपल्या कार्यालयामध्ये आपले नाव , पॅन नंबर ,दिनांक 12 जून 2023 पूर्वी सादर करण्याची आदेश संबंधित अधिकारी कर्मचारी यांना देण्यात आले आहेत . जे अधिकारी कर्मचारी जुन्या आयकर प्रणालीचा पर्याय स्वीकारतील , त्यांनी त्यांच्या संभाव्य 80C ,80D,80CCD ,80G गुंतवण्याची माहिती सदर पर्याय सोबत आवश्यक कागदपत्रासह दिनांक 12 जून 2023 पर्यंत संबंधित कार्यालय प्रमुखांना सादर करायचे आहे .

जे अधिकारी / कर्मचारी आयकर प्रणाली निवडीचा पर्याय विहित दिनांकापर्यंत सादर करणार नाहीत , त्यांची आयकर कपात नवीन आयकर प्रणालीप्रमाणे आयकर परिगनणा करून टीडीएस ( TDS ) कपात केली जाईल ,आयकर कपात संदर्भातील राज्य शासनाकडून निर्गमित करण्यात आलेला सविस्तर शासन परिपत्रक पुढील प्रमाणे पाहू शकता .

आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी ,शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच पेन्शनधारक कर्मचारी असाल तर Whatsapp ग्रुप मध्ये सामील व्हा !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *