लाईव्ह मराठी पेपर ,प्रणिता पवार : महाराष्ट्र राज्यातील सर्व सरकारी अधिकारी – कर्मचाऱ्यांची वैद्यकिय शिक्षण विभागांकडून तपासणी करण्यात येणार आहे . त्याचबरोबर यांमध्ये प्रथम राज्यातील शालेय विद्यार्थ्यांची तपासणी करण्यात येणार आहेत . राज्य वैद्यकिय शिक्षण विभागांकडून आरोग्य तपासणी बाबत विशेष अभियान सुरु करण्यात आले आहेत .
राज्यांतील नागरिकांमध्ये स्थुलपणाचे वाढते प्रमाणे लक्षात घेवून महाराष्ट्र शासनाच्या वैद्यकिय शिक्षण विभागांकडून स्थुलपणा जनजागृती आणि उपचार अभियान हाती घेण्यात आले आहेत . या मोहिमेची सुरुवात 4 मार्चपासुनच करण्यात आली असून , प्रथम शालेय विद्यार्थ्यांची तपासणी करण्यात आलेली आहे , शिवाय काही बाकी असणाऱ्या शालेय विद्यार्थ्यांची तपासणी पुढील काळांमध्ये करण्यात येणार आहे .
आता या अभियान अंतर्गत राज्यातील सर्व सरकारी कार्यालयांतील कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या स्थुलपणांची तपासणी करण्यात येणार आहेत . सरकारी कर्मचाऱ्यांची तपासणी दि.19 जुन ते 26 जून या दरम्यानच्या कालावधीत करण्यात येणार आहे .वैद्यकिय विभागांकडून स्थुलता कमी करा शरीराची कास धरा सुदृढ आरोग्याची असे घोषवाक्यासह नागरिक , कर्मचारी , विद्यार्थ्याना सल्ला देण्यात येत आहे .
हे पण वाचा : राज्य कर्मचाऱ्यांना 4% DA वाढ करणेबाबत राज्य शासनाकडून मंत्रालयीन प्रक्रिया पूर्ण !
सदर अभियाना अंतर्गत स्थुलपणा असणाऱ्यांना उपचार पद्धती सांगण्यात येणार आहेत . यामुळे या अभियान अंतर्गत स्थुलपणा असणारे नागरिक , नागरीकांनी उपचार पद्धतीचा लाभ घ्यावा . असे आव्हान या अभियानाचे समन्वयक डॉ.विनायक सावर्डेर यांनी केले आहे .
आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , पेन्शनधारक कर्मचारी असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !