Spread the love

लाईव्ह मराठी पेपर , संगिता पवार : महाराष्ट्र राज्य शासन सेवेतील राज्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या समूह वैयक्तिक अपघात विमा योजनेमध्ये सुधारणा करुन वाढीव विमा रक्कम प्रदान करणेबाबत राज्य शासनांच्या वित्त विभागांकडून दि.24.01.2023 रोजी अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय ( GR ) निर्गमित करण्यात आलेला आहे .

राज्यातील कर्मचाऱ्यांना समूह वैयक्तिक अपघात विमा योजनेमध्ये दि.01 एप्रिल 2023 पासून सुधारणा करण्याच्या अनुषंगाने सदर योजनेच्या वर्गणीमध्ये देखिल बदल करण्यात आलेला आहे . यांमध्ये राज्य शासन सेवेतील गट अ संवर्गातील अधिकाऱ्यांना 25 लाख रुपये पर्यंत विमा रक्कम प्रदान करण्यात येणार असून या करीता या वर्षांपासून वार्षिक वर्गणी 750/- + 135 रुपये वस्तु व सेवा कर अशी एकुण 885/- रुपये रक्कम वार्षिक आकारण्यात येणार आहेत .

तर गट ब संवर्गातील अधिकारी / कर्मचाऱ्यांना 20 लाख रुपये पर्यंत विमा रक्कम प्रदान करण्यासाठी वार्षिक वर्गणी 600/- रुपये + 108 रुपये वस्तु व सेवाकर अशी एकुण 708/- रुपये वार्षिक वर्गणी आकारण्यात येणार आहे .तर गट क व गट ड संवर्गातील कर्मचाऱ्यांसाठी 15 लाख रुपये अपघात विमा रक्कम प्रदान करण्यासाठी वार्षिक 450/- रुपये + 81/- रुपये अशी एकुण 531/- रुपये आकारण्यात येत आहेत .

हे पण वाचा : राज्य कर्मचाऱ्यांच्या नियमबाह्य / गैरसोयीच्या बदल्या !

या सुधारित विमा रक्कमेचा लाभ घेण्यासाठी आता दरवर्षी माहे फेब्रुवारी 2023 देय मार्च महिन्यांच्या वेतन देयकातुन वरील नमुद वार्षिक विमा रक्कम कपात करण्यात येणार आहेत , सदर वाढीव विमा रक्कमेचा लाभ राज्य कर्मचाऱ्यांना दि.01 एप्रिल 2023 पासून मिळणार आहेत . या संदर्भात महाराष्ट्र राज्य शासनांकडुन निर्गमित करण्यात आलेला सुधारित GR डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करावेत .

शासन निर्णय

आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *