Spread the love

मराठी पेपर , शासन निर्णय त्रिस्तरीय वेतनश्रेणी :  राज्यातील प्राथमिक , माध्यमिक , उच्च माध्यमिक व अध्यापक विद्यालयातील शिक्षकांना लागू करण्यात आलेल्या त्रिस्तरीय वेतनश्रेणीच्या अनुषंगाने प्रशिक्षण पुर्ण करण्याच्या अटीतुन सवलत देण्याबाबत , राज्य शासनांच्या शालेय शिक्षण व क्रिडा विभागांकडून दिनांक 04 सप्टेंबर 2023 रोजी अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे .

दिनांक 20 जुलै 20221 रोजीच्या शासन निर्णयान्वये राज्यातील खाजगी अनुदानित प्राथमिक / माध्यमिक / उच्च माध्यमिक शाळांमधील व अध्यापक विद्यालयातील शिक्षकांना लागु करण्यात आलेल्या त्रिस्तरीय वेतनश्रेणीच्या अनुषंगाने द्यावयाच्या प्रशिक्षणामध्ये अंशत :  बदल करुन तीन आठवड्याच्या सेवांर्गत प्रशिक्षणाऐवजी 10 दिवसांचे अथवा घड्याळी 50 तासांचे सेवांतर्गत प्रशिक्षण पुर्ण करण्याबाबत निर्णय घेण्यात आला आहे .

सदर शासन निर्णयान्वये प्रशिक्षण सुरु होण्याचा कालावधी अंदाजित करुन दिनांक 31/10/2021 पर्यंत सेवानिवृत्त होणाऱ्या अथवा त्यापुर्वी सेवानिवृत्त झालेल्या वरिष्ठ व निवड श्रेणीस पात्र शिक्षकांना प्रशिक्षण पुर्ण करण्याच्या अटीमधून सवलत देण्यात आली होती . सदर शासन निर्णयान्वये शासकीय / स्थानिक स्वराज्य संस्थांमधील शिक्षकांना तसेच मुख्याध्यापकांना देखिल लागु करण्यात आला आहे .

तसेच प्रशिक्षण कार्यक्रमाचे विकसनानंतर प्रत्यक्षात दिनांक 01 जून 2022 पासून प्रशिक्षण सुरु करण्यात आल्याने तसेच प्रशिक्षण सुरु झाल्यानंतर , प्रशिक्षण पूर्ण करुन प्रमाणपत्र मिळण्यासाठी 45 दिससांचा अवधी देण्यात आल्याने वरिष्ठ व निवड श्रेणीस पात्र दि.31.05.2022 अखेर सेवानिवृत्त तसेच काही प्रकरणी दिनांक 31.07.2022 अखेर सेवानिवृत्त शिक्षकांना सेवांतर्गत प्रशिक्षणाची संधी उपलब्ध झालेली नाही . त्यामुळे वरिष्ठ व निवड श्रेणीस पात्र शिक्षकांना सेवांतर्गत प्रशिक्षणाची संधी उपलब्ध झालेली नाही . त्यामुळे अशा वरिष्ठ व निवड श्रेणीस पात्र शिक्षकांना सेवांतर्गत प्रशिक्षणातून सवलत देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती .

यानुसार आता राज्यातील खजगी अनुदानित प्राथमिक / माध्यमिक / उच्च माध्यमिक शाळांमधील व अध्यापक विद्यालयातील शिक्षकांना लागू करण्यात आलेल्या त्रिस्तरीय वेतनश्रेणीच्या अनुषंगाने द्यावयाच्या प्रशिक्षणाबाबत निर्गमित शासन निर्णय दिनांक 20.07.2021 मधील परिच्छेद क्र.05 मध्ये नमूद प्रशिक्षण पुर्ण करण्याच्या अटीमधून सवलत देण्याबाबतची मुदत शासन स्तरावरुन प्रशिक्षणाचे आयोजन न झाल्याने / प्रशिक्षणाची संधी उपलब्ध न झाल्याने वाढविण्यात येत असून , दिनांक 31 जुलै 2022 पर्यंत सेवानिवृत्त झालेल्या वरिष्ठ व निवड श्रेणीस पात्र शिक्षकांना / मुख्याध्यापकांना प्रशिक्षण पुर्ण करण्याच्या अटीमधून सवलत देण्यात येत आहे .

या संदर्भात शालेय शिक्षण व क्रिडा विभागांकडून दिनांक 04.09.2023 रोजी निर्गमित करण्यात आलेला सविस्तर शासन निर्णय पुढीलप्रमाणे पाहु शकता ..

शासन निर्णय ( GR ) DOWNLOAD करा

आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच इतर पात्र कर्मचारी व सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *