Spread the love

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ state employee sudharit vetanshreni shasan nirnay ] : राज्य शासन सेवेतील कर्मचाऱ्यांच्या सातव्या वेतन आयोगानुसार वेतनत्रुटी दुर करण्यासाठी राज्य शासनांच्या वित्त विभाग मार्फत दि.16.03.2024 रोजी वेतनत्रुटी निवारण समितीचे गठण करण्यात आले होते .

सदर वेतनत्रुटी निवारण समितीचे कामकाज सुरु असून , सदर समितीला आपला अंतिम अहवाल सादर करण्याची मुदत ही दिनांक 31.10.2024 अशी देण्यात आलेली आहे . यामुळे सदर वेतनत्रुटी निवारण समितीकडून , सर्व विभागातील वेतनत्रुटींचे तपासणी करुन आपला अहवाल राज्य शासनांकडे मंजुरीसाठी पाठविण्यात येणार आहेत .

सदर समितीला आपला कामकाज पुर्ण करण्यासाठी वित्त विभागाच्या दिनांक 11.09.2024 रोजीच्या निर्णयानुसार , दिनांक 31.10.2024 पर्यंत मुदतवाढ दिली गेली आहे . यांमध्ये ज्या पदांच्या वेतनत्रुटीचे प्राप्त अहवालानुसार , तपासणी करुन आपला अहवाल तयार करण्याचे सुचित करण्यात आले आहेत .

सदर समितीला प्रथम : सहा महिन्यांची दिनांक 15.09.2024 पर्यंत मुदत वाढ देण्यात आलेली होती , तर वित्त विभागाच्या दिनांक 11.09.2024 रोजीच्या निर्णयानुसार , सदर समितीला दिनांक 31.10.2024 पर्यंत मुदतवाढ दिली गेली आहे .

सदर वेतनत्रुटी अहवालास राज्य शासनांकडुन मंजुरी दिल्यास , राज्य कर्मचाऱ्यांच्या सातव्या वेतन आयोगातील वेतनत्रुटी दिवाळी सणापुर्वीच दुर करुन सुधारित वेतनश्रेणी लागु करण्यात येईल .

आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *