राज्य कर्मचाऱ्यांना सुधारित वेतन नियम 2019 व व्याप्ती , सुधारित वेतनरचना बाबत संपुर्ण माहिती पुस्तिका ( PDF )

Spread the love

लाईव्ह मराठी पेपर , संगिता पवार : राज्यातील शासकीय व इतर पात्र कर्मचाऱ्यांना दिनांक 01.01.2016 पासून सुधारित वेतन रचनेत वेतन अनुज्ञेय करण्यात आले आहेत . सदर वेतन हे राज्य शासनांच्या राज्यपाल यांच्या नियमकारी नियंत्रणी खाली असणारे सर्व कर्मचारी तसेच राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना लागु करण्यात आलेले आहेत . सदर नियमावली मध्ये काही अंशी बदल करुन शालेय शिक्षण तसेच ग्रामविकास / नगरविकास विभाग / उच्च व तांत्रिक शिक्षकण / कृषी विद्यापिठे इ.विभागाकरीता स्वतंत्र आदेश निर्गमित करुन सुधारित वेतन लागु करण्यात आले आहेत .

सदरचा सुधारित वेतन निश्चित करण्यापुर्वी कर्मचाऱ्यांचे 1986 , 1996,2006 च्या वेतन निश्चितीचे वेतन पडताळणी पथकाकडून प्रमाणित करण्यात आलेले आहेत , तसेच वित्त विभागाच्या दि.05.05.2010 नुसार देय वेतनवाढी लागु करण्यात आलेल्या आहेत . तसेच सदर सुधारित वेतन लागु करताना कर्मचाऱ्यांचे निलंबन / बडतर्फी , पदोन्नती / पदान्नवती , एकस्तराचा लाभ मिळाला आहे काय ? वेतनवाढ रोखली आहे काय ? अशा विविध बाबींची तपासणी करण्यात आलेली आहे .

सदर वेतन नियमांमध्ये वेतनाची व्याख्या नमुद करण्यात आलेली आहे , वेतन म्हणजे महाराष्ट्र नागरी सेवा 1981 वेतन नियम 9 खाली दिलेल्या व्याख्येनुार वेतन श्रेणी मध्ये आहारीत होत असलेल्या मुळ वेतन म्हणजेच वेतन होय .

असुधारित वेतन रचनेमध्ये ( सहाव्या वेतन आयोग ) मध्ये एकुण 38 वेतन रचना अस्तित्वात होत्या आता सुधारित वेतन रचनेंमध्ये एकुण 31 वेतन रचना झाल्या आहेत .राज्य शासनांकडून सुधारित वेतन रचना पुढीलप्रमाणे लागु करण्यात आली आहे ..

सुधारित वेतन निश्चितीबाबतचे काही ठळक तरतुदी :  सदरचे सुधारित वेतन हे दि.01.01.2016 पासूनच देय करण्यात आलेले आहेत .दोन वेतनश्रेण्या विलिन झाल्या असतील आणि खालच्या श्रेणीत समान / निम्न वेतन घेणारा कर्मचारी वरच्या श्रेणीतील वरिष्ठ कर्मचाऱ्याच्या पेक्षा अधिक वेतन घेत असेल तर त्याच्या वेतनाऐवढी वेतनवृद्धी वरिष्ठ कर्मचाऱ्यास लागु करण्यात आलेली आहे .

एकस्तर वेतन निश्चिती बाबत :  शासन निर्णय दि.06 ऑगस्ट 2002 नुसार आदिवासी क्षेत्राचे बळकटीकरण करण्याकरीता एकस्तर योजना लागु करण्यात आली आहे , त्यामुळे या योजने अंतर्गत नक्षलग्रस्त / आदिवासी क्षेत्रातील कार्यरत बदली पात्र कर्मचाऱ्यास त्या क्षेत्रात असेपर्यंत किंवा शासनाचे आदेश होईपर्यंत एकस्तर वेतनश्रेणीचा लाभ्ज्ञ अनुज्ञेय असणार आहेत . वेतन निश्चिती महाराष्ट्र नागरी सेवा नियम 1981 मधील नियम 11  ( 1 ) नुसार करावयाची असणार आहे , त्यामुळे सुधारित वेतन निश्चिती सुधारित सुधारित वेतन नियम 2019 मधील 13 नुसार करण्यात येत आहेत .

या संदर्भात सुधारित वेतन नियम , व्याप्ती तसेच वेतन रचना याबाबतची संपुर्ण माहिती पुस्तिका PDF स्वरुपात डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करावेत ..

राज्य सुधारीत वेतन नियम पुस्तिका PDF

आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !

Leave a Comment