Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Sudharit National Pension Scheme ] : राज्यातील राष्ट्रीय पेन्शन धारक कर्मचाऱ्यांना दिनांक 01.11.2005 पासुन सुधारित पेन्शन योजना लागु करणेबाबत , राज्य शासनांकडून मोठा निर्णय घेतला आहे , परंतु यांमध्ये काही छुप्या अटी / शर्ती आहेत , जे कि राज्य कर्मचाऱ्यांना मान्य नाहीत .
50 टक्के पेन्शन प्राप्तीसाठी कमाल सेवेची अट : सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजनांमध्ये एनपीएस धारकांना टक्के पेन्शन मिळेल , अशा पद्धतीने सुधारित पेन्शन प्रणाली अस्तित्वात आणली आहे . परंतु या सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजनांमध्ये सेवानिवृत्ती नंतर शेवटच्या मुळ वेतनाच्या 50 टक्के रक्कम पेन्शन म्हणून प्राप्तीसाठी कर्मचाऱ्यांची शासन सेवेतील कमाल सेवा ही 30 वर्षे अथवा त्यापेक्षा अधिक होणे आवश्यक असणार आहे .
जे कि जुनी पेन्शन योजनांमध्ये फक्त 10 वर्षे सेवा पुर्ण झाल्याच्या नंतर देखिल सेवानिवृत्ती नंतर कर्मचाऱ्यांना शेवटच्या वेतनाच्या 50 टक्के रक्कम पेन्शन म्हणून प्राप्त होते , तर स्वेच्छा निवृत्ती प्रकरणी 20 वर्षे सेवा पुर्ण झालेल्या कर्मचाऱ्यांना निवृत्तीवेळी मिळणाऱ्या मुळ वेतनाच्या 50 टक्के रक्कम पेन्शन म्हणून प्राप्त होते , तर सुधारित पेन्शन प्रणालींमध्ये स्वेच्छा निवृत्ती प्रकरणी कोणत्याही प्रकारची तरतुद केली गेली नाही .
NPS मधील कर्मचाऱ्यांचे योगदान कायम : NPS प्रणाली मधील कर्मचाऱ्यांचे 10 टक्के योगदान सुधारित राष्ट्रीय पेन्शन प्रणालीमध्ये कायम ठेवण्यात आलेले आहेत , तर तर ही कपात करण्यात आलेली रक्कम कर्मचाऱ्यांना परत दिली जाणर नसुन सुधारित राष्ट्रीय पेन्शन प्रणालींमध्ये सदरचे कर्मचाऱ्यांचे योगदानाचा वापर करुन पेन्शन दिली जाणार आहे .
पेन्शन वृद्धी व GPF लाभ लागु नाही : सदर सुधारित राष्ट्रीय पेन्शन प्रणालीनुसार कर्मचाऱ्यांना जुन्या पेन्शन प्रमाणे पेन्शन वृद्धी तसेच भविष्य निर्वाह निधी लाभ लागु असणार नाहीत .
आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.