लाईव्ह मराठी पेपर , प्रणिता पवार : महाराष्ट्र राज्य संवर्गातील कर्मचाऱ्यांना सुधारित वेतन संरचना लागु करणेबाबत महाराष्ट्र राज्याच्या शालेया शिक्षण व क्रिडा विभागांकडून दि.08 जून 2023 रोजी महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे .7 व्या वेतन आयोगानुसार सदर निर्णयांमध्ये नमुद कर्मचाऱ्यांना सुधारित वेतन संरचना लागु करणत आलेली आहे .
राज्य शासन सेवेतील बऱ्याच कर्मचाऱ्यांना अद्याप पर्यंत असुधारित वेतनश्रेणींमध्ये वेतन मिळते . अशा असुधारित वेतन संरचनेमध्ये वेतन धारण करणाऱ्या कर्मचाऱ्यांना सुधारित वेतन संरचना ( सातव्या वेतन आयोग ) नुसार सुधारित वेतन राज्य शासनांच्या संमतीने लागु करण्यात येत असते . महाराष्ट्र राज्यातील शासकीय , निमशासकीय ( जिल्हा परिषदा ) इतर पात्र कर्मचारी तसेच अनुदानित शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना सन 2016 पासुनच सातव्या वेतन आयोगाचा लाभ अनुज्ञेय करण्यात आलेला आहे .
सदर शासन निर्णयानुसार , भोसला मिलीटरी स्कुल नाशिक या संस्थेमधील अधिकारी / कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोागाच्या शिफारशीनुसार सुधारित वेतन संरचना लागु करण्यात आलेली आहे .यांमध्ये समादेशक पदांस सुधारित वेतनश्रेणीनुसार 78,800-2092200/- , चिफ ट्रेनिंग ऑफिसर पदांस 29,200-93,300/- , ट्रेनिंग अधिकारी पदांस 21,700-69100/- , सहाय्यक ट्रेनिंग अधिकारी व मेस मॅनेजर पदांस 21,700-69,100/- सातव्या वेतन आयोगानुसार सुधारित वेतन संरचना लागु करण्यात आलेली आहे .
सदर अधिकारी / कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाच्या थकबाकीचे तीन हप्ते एकत्रित अदा करण्यास सहमती देण्यात येत आहे . तसेच उर्वरित थकीबाकीचे दोन हप्ते सदर शास निर्णयानुसार अदा करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत . सुधारित वेतन संरचना लागु करणेसंदर्भात शालेय शिक्षण व क्रिडा विभागांकडून दि.08 जून 2023 रोजी निर्गमित करण्यात आलेला सविस्तर शासन निर्णय डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करावेत .
आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच पेन्शनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !