Spread the love

Live Marathipepar प्रतिता पवार [ State Employee Medical Bill ] : राज्य शासन सेवेत कार्यरत अधिकारी / कर्मचाऱ्यांना महाराष्ट्र राज्स सेवा ( वैद्यकीय देखभाल  ) नियम 1961 अंतर्गत वैद्यकीय पुर्तता करण्यात येते , यांमध्ये दिनांक 01 सप्टेंबर 1987 रोजी सुधारणा करण्यात आली . यांमध्ये शासकीय कर्मचाऱ्यांने मोर्फत परिचर्येसाठी खर्च केलेल्या एखाद्या रकमेची वैद्यकीय प्रतिपुर्ती , प्रवास भत्ता , रुग्णाच्या निवासस्थानी उपचार , वैद्यकीय प्रतिपुर्तीच्या मागण्या सादर करण्यो इ. माहिती देण्यात आलेली आहे , सविस्तर सुधारित माहिती पुढीलप्रमाणे पाहुयात ..

सदर वैद्यकीय देखभाल नियमांनुसार रुग्ण म्हणजे शासकीय कर्मचारी किंवा त्यांच्या कुटुंबातील कोणताही व्यक्ती . तर शसकीय कर्मचारी म्हणजे राजेंदारीवर नेमलेला कर्मचारी वर्ग वगळता , महाराष्ट्र सरकारने पुर्णवेळ पद्धतीने नेमलेली कोणतीही व्यक्ती मग ती कायम असो अथवा तात्पुरती असो , त्यामध्ये रजेवर असलेला किंवा निलंबित केलेला शासकय कर्मचारी आणि कोणताही शासकीय रुग्णालयातील मानसेवी वैद्यकीय अधिकारी , एक वर्षापेक्षा कमी नसलेली सेवा झालेली व मासिक दराने वेतन घेणारे कार्यव्ययी आस्थापनेवर नेमलेले कर्मचारी यांचा समावेश होतो .

कुटुंबाची व्याख्या : तर कुटुंब म्हणजे शासकीय कर्मचाऱ्याची पत्नी किंवा पती ,तसेच शासकीय कर्मचाऱ्यावर अवलंबून असतील अशी शासकीय कर्मचाऱ्याची औरस मुले , कायदेशिर दत्तक घेतलेली मुले तसेच शासकीय कर्मचाऱ्यांवर पुर्णपणे अवलंबून असलेले शासकीय कर्मचाऱ्यांचे आईवडील यांचा समोवश कुटंब मध्ये होतो .

महिला शासकीय कर्मचाऱ्याला तिच्यावर पुर्णपणे अवलंबून असलेल्या आणि तिच्या बरोबर राहत असलेल्या तिच्या आईवडिलाची किंवा सासू – सासऱ्यांची निवड करता येणार आहे . शासकीय कर्मचाऱ्यावर पुर्णपणे अवलंबिून असलेला 18 वयाखालील अविवाहित भाऊ , शासकीय कर्मचाऱ्यावर पुर्णपणे अवलंबून असलेल्या अविवाहित बहिणी व घटस्फोटीत बहिणी ( यांमध्ये वय लक्षात न घेता ) समावेश असेल .

रुग्णाच्या निवासस्थानी उपचार करणे :  योग्य ते शासकीय रुग्णालय नाही / दुर अंतरावर आहे / त्याचा आजार तिव्र स्वरुपाचा आहे , या कारणास्तव प्राधिकृत वैद्यकीय देखभाल अधिकाऱ्याच्या मते रुग्णावर नियम 8 च्या पोटनियम 2 मध्ये तरतुद केल्याप्रमाणे उपचार करता येत नसतील तर रुग्णाच्या निवासस्थानी उपचार घेता येते .

वैद्यकीय खर्चाच्या प्रतिपुर्तीच्या मागण्या सादर करणे : या नियम अंतर्गत अनुज्ञेय असणाऱ्या प्रतिपुर्तीच्या सर्व मागण्या संबंधित शासकीय कर्मचाऱ्यांच्या नियंत्रक प्राधिकाऱ्याकडे वैद्यकीय देखभाल / उपचार पुर्ण झाल्यापासून एक वर्षाच्या आत , सादर करण्यात येतील आणि त्‍या संबधित शासकीय कर्मचाऱ्याचे भत्त व मानधन ज्या लेखाशिर्षखाली खर्ची घालण्यात येत असेल त्याच लेखाशिर्षाखाली खर्ची घालण्यात येतील .

तर संबंधित शासकीय कर्मचाऱ्याच्या प्रवासभत्ता बिलांवर प्रतिस्वाक्षरी करण्यास सक्षम असणारे नियंत्रक प्राधिकारी प्रतिपुर्तीच्या सर्व मागण्यांवर प्रतिस्वाक्षरी करतील . अशा सर्व मागण्यांच्या पृष्ठ्यर्य आवश्यक ती बिले , प्रमाणके , प्रमाणपत्रे , प्रमाणपत्रे इत्यादी सादर करण्यात येतील . नियंत्रक प्राधिकारी प्रतिस्वाक्षरी करण्यापुर्वी या मागण्या नियमांनुसार अनुज्ञेय याविषयी आपली खात्री करुन घेतील .

या संदर्भातील सविस्तर सुधारित वैद्यकीय देखभाल नियम पुस्तिकी व वैद्यकीय खर्चाच्या पुर्तता साठी आवश्यक सर्व अर्जाचे नमुने डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करावेत .

सुधारीत नियमावली (PDF)

आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *