अखेर आंदोलनाचा दिवस ठरला ! जुनी पेन्शन , निवृत्तीचे वय 60 वर्षे , आश्वासित प्रगती योजना , वेतनवाढ , पदोन्नती अशा विविध मागणीसाठी धरणे आंदोलन ..

Spread the love

लाईव्ह मराठी पेपर , प्रणिता पवार : राज्य कर्मचारी जुनी पेन्शन योजना , सेवानिवृत्तीचे वय 60 वर्षे करणे , तसेच वेतनावाढ , पदोन्नती अशा विविध मागणीसाठी आझाद मैदानात दिनांक 23 ऑगस्ट 2023 रोजी धरणे आंदोलन करणार आहेत , या आंदोलनास राज्यभरातुन कर्मचारी उपस्थित राहणार असून , आंदोलनास उपस्थित राहण्यासाठी कर्मचाऱ्यांना संघटनेकडून आव्हान करण्यात आलेले आहेत .

CITU प्रणित आदिवासी विकास विभाग आश्रमशाळा शिक्षक व कर्मचारी संघटनेच्या वतीने दिनांक 23 ऑगस्ट 2023 रोजी आझाद मैदान , मुंबई येथे आपल्या विविध धोरणात्मक समस्या व मागण्या सोडवणे कामी धरणे आंदोलने करण्यात येणार आहेत , तसेच आश्रमशाळा कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित समस्या राज्याचे आदिवासी विकास मंत्री नामदार विजयकुमार गावित यांना निवेदन सादर करण्यात आलेले आहेत .सदर समस्या तोडगा निघत नसल्याने , दिनांक 23 ऑगस्ट 2023 पासून राज्यभरातुन सर्व आश्रमशाळा कर्मचारी आझाद मैदानावर बेमुदत उपोषण आंदोलन करणार आहेत , यामधील प्रमुख मागण्या पुढीलप्रमाणे आहेत ..

यांमध्ये सदर कर्मचाऱ्यांची प्रमुख मागणी म्हणजे शालेय वेळापत्रक पुर्वीप्रमाणे सकाळी 11 ते सायंकाळी 5 पर्यंत करण्यात यावेत . जुनी पेन्शन योजना लागु करण्यात यावी , तसेच केंद्राप्रमाणे निवृत्तीचे वय 60 वर्षे करण्यात यावेत ..तसेच शाळा व वसतिगृह विभाग वेगळा करणेबाबत , शासन निर्णयाची अंमलबजावणी करण्यात यावी . तसेच नविन आकृतीबंध रद्द करुन विलोपित झालेली पदे पुनर्जिवित करण्यात यावीत .

तसेच रोजंदारी वर्ग -3 व वर्ग – 4 व कंत्राटी कला , क्रिडा व संगणक तत्वावरील कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करावे तसेच बाह्य स्त्रोताद्वारे भरती प्रक्रिया कायमस्वरुपी रद्द करावी . तसेच आदिवासी विकास विभागातील कार्यालयीन कर्मचाऱ्यांप्रमाणे 10-20-30 वर्षाची त्रिस्तरीय वेतनश्रेणी शासकीय व अनुदानित आश्रमशाळेतील शिक्षक संवर्गाला सुद्धा लागु करावी .

हे पण वाचा : राज्य कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागणीबाबत विधासभेत झाली चर्चा , मंत्र्याने कार्यवाही करण्याचे दिले आदेश !

तसेच इयत्ता 10 वी व इयत्ता 12 वीचे निकाल 80 टक्के व 50 टक्के पेक्षा कमी लागल्यास होणारी वेतनवाढ रोखण्याची कार्यवाही तात्काळ रद्द करुन शिक्षकांना विश्वासात घेवून विद्यार्थी गुणवत्तेसाठी नियोजन करण्यात यावेत ..तसेच शासकीय व अनुदानित आश्रमशाळेतील मुख्याध्यापकांना राजपत्रित अधिकाऱ्याचा दर्जा देण्यात यावा तसेच अधिक्षक व अधिक्षिकांना सहाय्यक पदे निर्माण केली आहेत त्याची अंमलबजावणी करण्यात यावीत ..

हे पण वाचा : राज्यातील शासकीय कर्मचाऱ्यांच्या या भत्त्यांमध्ये मोठी , वित्त विभागाकडून शासन निर्णय निर्गमित ! GR दि.07.08.2023

तसेच ग्रंथपालांना सुधारित वेतनश्रेणी तसेच उन्हाळी व दिवाळीच्या दीर्घ सुट्टीचा लाभ मिळावा , तसेच कनिष्ठ महाविद्यालय शिक्षकांना पदोन्नतीचे सेवाशर्तीविषयक नियम तयार करुन पदोन्नतीची संधी उपलब्ध करुन देण्यात यावेत . तसेच वरिष्ठ वेतनश्रेणी नंतर एकस्तर वेतनश्रेणीचा लाभ पुढे नियमित चालु ठेवण्यात यावेत  अशा विविध 16 मागण्यांकरीता दिनांक 23 ऑगस्ट 2023 रोजी आझाद मैदान येथे राज्य कर्मचारी आंदोलन करणार आहेत .

आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !

Leave a Comment