Spread the love

Live Marathipepar संगिता पवार [ State Employee Leave Rules ] : राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना त्यांच्या सेवाकालावधीमध्ये अनेक प्रकारच्या रजा दिल्या जातात , यांमध्ये काही रजा ह्या कमी कालावधीच्या तर काही रजा ह्या दिर्घ कालावधीच्या रजा दिल्या जातात . या संदर्भातील रजेचे प्रकार , कोणत्या कारणांसाठी दिले जातात , तसेच रजेचा कालावधी या संदर्भातील सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे पाहुयात ..

किरकोळ रजा : राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना एका वर्षांमध्ये ( जानेवारी ते डिसेंबर ) एकुण 08 दिवस किरकोळ रजा घेता येते . सदर किरकोळ रजेची नोंद ही सेवा पुस्तकांमध्ये करण्यात येत नाही तर यासाठी स्वतंत्र नोंदवहीमध्ये , किरकोळ रजेची नोंद घेण्यात येते .किरकोळ रजा ही एक प्रकारची कर्तव्य कालावधीमधून दिलेली तात्पुरती सुट असल्याने , किरकोळ रजा घेण्यापुर्वी कार्यालय प्रमुखांची परवानगी घेणे आवश्यक असते , कार्यालय प्रमुखांस रजा नाकारणे / मुंजुर करण्याचा अधिकार असतो .

विशेष नैमित्तिक रजा : राज्य कर्मचाऱ्यांना सेवा काळांमध्ये कुटुंबासाठी पुरेसा वेळा देता यावा तसेच काही विशेष कारणांसाठी विशेष नैमित्तिक रजा देण्यात येते .यांमध्ये प्रामुख्याने आरोग्य विषयक कारणे , तसेच कौटंबिक खाजगी वैद्यकीय कारणास्तव विशेष नैमित्तिक रजा घेण्यात येत असते .

विशेष नैमित्तिक रजेचे प्रकार कोणत्या कारणांसाठी घेता येते , तसेच किती दिवसांसाठी घेता येते , याबाबत सविस्तर माहिती खालील चार्टनुसार पाहु शकता ..

आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *