Spread the love

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ state employee shistabhang vishayak karyavahi shasan nirnay gr ] : राज्यातील अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या शिस्तभंग विषयक कारवाई प्रकरणांच्या कार्यपद्धतीबाबत , राज्य शासनांच्या सामान्य प्रशासन विभाग मार्फत दिनांक 27 सप्टेंबर 2024 रोजी अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे .

राज्य शासकीय अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या शिस्तभंग विषयक कारवाईची प्रकरणे अभिप्रायार्थ तसेच सहमतीकरीता सामान्य प्रशासन विभागास अन्य प्रशासकीय विभागांकडून प्राप्त होत असतात , असे प्रस्ताव प्राप्त झाल्याच्या नंतर विभागीय चौकशीच्या अनुषंगाने सर्व टप्पे अनुसरले आहेत अथवा कसे याबाबत विहीत कार्यपद्धतीनुसार प्रकरण हाताळण्यात आले आहेत , अथवा कसे याबाबतची छाननी करुनच त्यावर सा.प्रशासन विभाग मार्फत नियमानुसार अभिप्राय देण्यात येत असतात .

प्राप्त झालेल्या प्रस्तावांमध्ये गैरवर्तणुकीचा तपशिल , अपचाऱ्याचा सेवा , चौकशी अहवाल , दोषारोपपत्रे , अहवालावरील चौकशी अधिकाऱ्यांचे तसेच विभागाचे निष्कर्ष इ. बाबी सुसुत्रिपणे नसल्यास तसेच काही तपशिल संदर्भात कागदपत्रे प्रस्ताव सोबत , उपलब्ध करुन देण्यात येत नसल्यास परिणामी , संपुर्ण तसेच सुस्पष्ट तपशिल अभावी प्रस्तावांची तपासणी करुन त्यावर सुस्पष्ट अभिप्राय देण्यास सा. प्रशासन विभागास अडचणी निर्माण होतात , तसेच विभागांकडे अपूर्ण माहितीकरीता पाठपुरावा करण्यास वेळ जातो , या सर्व बाबींमुळे प्राप्त प्रस्तावांवर अभिप्राय देण्यास विलंब लागतो .

याकरीता सा.प्र.विभागास प्राप्त होणाऱ्या शिस्तभंग विषयक कारवाईच्या प्रकरणी टिप्पण्यांचे प्रारुप नमुने तयार करण्यात आले असून , सर्व मंत्रालयीन प्रशासकीय विभागांना कळविण्यात येत आहे कि , विभागांकडून प्राप्त होणाऱ्या दोषारोप प्रस्ताव , शिक्षा प्रस्ताव व अपचाराऱ्याच्या अंतिम शिक्षेचे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे पाठवावयाच्या पत्राचे प्रारुप सादर करताना प्रस्ताव सदर परिपत्रकांसोबत‍ जोडलेल्या टिप्पणीच्या नमुन्यांमध्ये सादर करण्याचे निर्देश आहेत .

  1. यांमध्ये दोषारोप ज्ञापनांस मान्यतेचा प्रस्ताव – नमुना अ
  2. शिक्षेच्या सहमतीचा प्रस्ताव – नमुना ब
  3. शिक्षेच्या अनुषंगाने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे पत्रव्यवहाराच्या प्रारुपास देण्याचा प्रस्ता नमुना – क

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *