Spread the love

लाईव्ह मराठी पेपर , बालाजी पवार : महाराष्ट्र राज्य शासन सेवेतील कर्मचाऱ्यांच्या संदर्भात अत्यंत महत्त्वपूर्ण शासन परिपत्रक प्राथमिक शिक्षण संचालक विभागाकडून दिनांक 21 जून 2023 रोजी निर्गमित झालेला आहे .

सेवानिवृत्ती वेतन, मृत्यू आणि सेवा उपदान अंशराशीकरण इत्यादी रक्कम प्राधान्याने अदा करणे आवश्यक आहे .तसेच जिल्हा परिषद व महानगरपालिका /नगरपालिका/ नगरपरिषदा /कटक मंडळे यातील सेवानिवृत्ती शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे त्यांना मृत्यू नि सेवा उपदान ,अंशराशीकरण इत्यादी देय असलेल्या रकमा प्रलंबित असल्याचे निदर्शनास आल्याचे कळवले आहे .

संचालनाच्या पत्रानुसार सन २०२३-२४ मध्ये सेवानिवृत्त होणारे कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीनंतर देय लाभावर गणना करून आवश्यक तरतुदी मागणी सोबत जोडलेल्या विवरण पत्रानुसार दोन दिवसात उपलब्ध माहिती सादर करण्याचे आदेश संबंधित विभागीय शिक्षण उपसंचालक तसेच शिक्षणाधिकारी जिल्हा परिषद सर्व यांना आदेशित करण्यात आली आहेत .

हे पण वाचा : महाराष्ट्र राज्य कर्मचाऱ्यांचा दि.04 जुलै रोजी जुनी पेन्शन मागणीसाठी पुन्हा एकदा राज्यव्यापी आंदोलनाचा पवित्रा !

परंतु अद्याप जिल्हा परिषद व महानगरपालिका / नगरपालिका/ नगरपरिषदा/ कटक मंडळे यातील सेवानिवृत्त शिक्षक – शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे थकीत मृत्यू नि सेवा उपदान अंशराशीकरण सातवा वेतन आयोगाच्या फरकाचा हप्त्याची माहिती सादर करण्यात आलेली नाही . तरी सदर माहिती दिनांक 22 जून 2023 रोजी संचालनालयास सादर करण्याचे आदेशित करण्यात आले आहेत .

त्याचबरोबर सदर माहिती विहित कालमर्यादित प्राप्त न झाल्यास माहिती अभावी निधी उपलब्ध न झाल्यास जिल्हा परिषद व महानगरपालिका /नगरपरिषदा /नगरपालिका /कटक मंडळे यातील सेवानिवृत्ती शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे लाभ अदा न झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित शिक्षण उपसंचालक / शिक्षणाधिकारी जिल्हा परिषद सर्व यांची राहील अशी सूचना देण्यात आली आहे .

आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेतर कर्मचारी तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक असाल तर व्हाट्सअप ग्रुप मध्ये जॉईन व्हा !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *