Spread the love

Live marathipepar संगिता पवार , प्रतिनिधी [ State Employee Todays IMP GR ] : आज दिनांक 17 नोव्हेंबर 2023 रोजी राज्य शासनांच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागांकडून राज्य कर्मचारी बाबत अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहेत , यानुसार सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना काल्पनिक वेतनवाढ लावून सेवानिवृत्तीवेतन लागु निश्चित करण्याचे नमुद करण्यात आलेले आहेत .

वित्त विभागाच्या दिनांक 28 जुन 2023 रोजीच्या शासन परिपत्राकानुसार , दिनांक 30 जुन रोजी सेवानिवृत्त झालेल्या / होणाऱ्या राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना लगतच्या 01 जुलै ची काल्पनिक वेतन वाढ विचारात घेवून सेवानिवृततीवेतन निश्चित करण्याबाबत मार्गदर्शक सुचना देण्यात आलेल्या आहेत . सदर सूचना उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या नियंत्रणाखालील अनुदानित शैक्षणिक संस्थामधील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना लागु करण्याची बाबत राज्य शासनांच्या विचाराधीन होती , यानुसार आता पुढीलप्रमाणे निर्णय घेण्यात आलेला आहे .

सदर शासन निर्णयानुसार वित्त विभागाच्या दिनांक 28 जुन 2023 रोजीच्या संदर्भाधिन परिपत्रकानुसार देण्यात आलेल्या सुचना अकृषी विद्यापीठे अनुदानित महाविद्यालये / संस्था , डॉ.बाबासाहेब आंबेडकर तंत्र शिक्षण विद्यापीठ – लोणेरे , सी.ओ.ई पी तंत्रज्ञान विद्यापीठ , अनुदानित कला संस्था , आय सी.टी विद्यापीठ , एल आयटी अभिनव तंत्रज्ञान विद्यापीठ यामधील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना लागु करण्यात येत आहेत , सदर सुचनांचे तंतोतंत पालन करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत .

या संदर्भात राज्य शासनांच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागांकडून दिनांक 17 नोव्हेंबर 2023 रोजी निर्गमित करण्यात आलेला सविस्तर शासन निर्णय पुढीलप्रमाणे पाहू शकता..

आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *