Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ State Employee Shasan Nirnay imp ] : राज्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या बाबतीत शालेय शिक्षण व क्रिडा विभागांकडून दिनांक 08 फेब्रुवारी 2024 रोजी अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे .
वित्त विभागांकडून अर्थसंकल्पीय वितरण प्रणालीवर प्राप्त झालेल्या अनुदानाचा निधी नियंत्रक अधिकारी आयुक्त – क्रिडा व युवक सेवा महाराष्ट्र राज्य पुणे व सह सचिव / उप सचिव शालेय शिक्षण व क्रिडा विभाग मंत्रालय मुंबई यांना वितरीत करण्याची बाब राज्य शासनांच्या विचाराधीन होती , यानुसार आता सन 2023-2024 या आर्थिक वर्षातील शालेय शिक्षण व क्रिडा विभागासाठी अर्थसंकल्पित झालेला व वित्त विभागांकडून BEAMS प्रणालीवर प्राप्त झालेला निधी पुढीलप्रमाणे नियंत्रक अधिकाऱ्यांच्या अधिनस्त ठेवण्यासाठी मान्यता देण्यात येत आहेत .
सन 2023-24 या आर्थिक वर्षात वित्त विभागाने बिम्स प्रणालीवर उपलब्ध करुन दिलेला निधी / अनुदान हे वित्त विभागाने शासकीय कर्मचाऱ्यांना अग्रिम मंजूर करण्यास्तव वेळोवेळी निर्गमित केलेले शासन निर्णय / शासन परिपत्रक यामधील तरतुदी विचारात घेवून संबंधितांना अनुज्ञेय असणाऱ्या किमान रक्कमेच्या मर्यादेतमध्येच घरबांधणी अग्रिम वितरीत करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत . तसेच दिनांक 01 मे 2001 रोजी अथवा त्यानंतर 02 पेक्षा अधिक अपत्ये असणाऱ्या अर्जदारास सदर अग्रिमाचा लाभ घेता येणान नाही . तसेच ज्या उद्देशाकरीता निधी / अनुदान मंजूर आहे त्या व्यतिरिक्त इतर उद्देशासाठी खर्च करता येणार नाही .
सदर खर्चाचा प्रगती अहवाल मासिक निधी विवरणपत्रानुसार , नियंत्रक अधिकाऱ्यांनी दरमहा शासनास 10 तारखेपर्यंत सादर करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत . तसेच पदनिर्मितीच्या अनुषंगाने वेतनावरील निधी वाटपाच्या संदर्भात आवश्यक तेथे उच्चस्तरीय सचिव समिती / मंत्रीमंडळ यांची मान्यता तसेच वित्त विभागाने वेळोवेळी दिलेल्या सूचनांच्या अनुषंगाने कार्यवाही झाल्याची खात्री करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत .
विविध शासकीय / प्रशासकीय संस्थाना तसेच अनुदानित संस्थांना सहायक अनुदाने मंजूर करण्यापुर्वी त्यांचेकडून पुर्वी वितरीत करण्यात आलेल्या अनुदानाच्या खर्चाची उपयोगिता प्रमाणपत्रे विभागाने प्राप्त करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत . या संदर्भातील शालेय शिक्षण व क्रिडा विभागांकडून दिनांक 08 फेब्रुवारी 2024 रोजी निर्गमित करण्यात आलेला सविस्तर शासन निर्णय डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करावेत ..
आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.