Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ State Employee Shasan Nirnay GR ] : राज्यातील कर्मचाऱ्यांना शासन सेवेत नियुक्तीनंतर 03 वर्षाची नियमित सेवा पुर्ण केल्यानंतर शासन सेवेमध्ये स्थायी कर्मचारी म्हणून संबोधण्यासाठी स्थायित्व प्रमाणपत्र धारण करणे आवश्यक असते . याबाबत स्थायीत्व प्रमाणपत्र देणे संदर्भात सामान्य प्रशासन विभागांकडुन अनेक शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेले आहेत . सदर शासन निर्णयांमध्ये सुधारणा करणे संदर्भात सामान्य प्रशासन विभागांकडून दिनांक 11 सप्टेंबर 2014 रोजी महत्वपुर्ण शासन परिपत्रक निर्गमित करण्यात आलेला आहे .
स्थायित्व प्रमाणपत्र हे प्रथम पदावरील नियुक्ती संदर्भात दिले जाते , याकरीता प्रथम नियुक्तीच्या पदावर सेवेत रुजु होवून 03 वर्षे नियमित सेवा पुर्ण केल्यानंतर राज्यातील गट अ व गट ब ( राजपत्रित ) अधिकाऱ्यांच्या बाबतीत संबंधित नियुक्ती प्राधिकाऱ्याने तर गट ब ( अराजपत्रित ) , गट क आणि गट ड संवर्गातील कर्मचाऱ्यांच्या बाबतीत संबंधित कार्यालय प्रमुखांने स्थायित्व प्रमाणपत्र देणे आवश्यक असणार असते .
यांमध्ये अधिकारी / कर्मचाऱ्यांची नियुक्ती ही सेवा प्रवेश नियमानुसार तसेच विहीत पद्धतीने होणे आवश्यक असते , तसेच कर्मचारी सेवेत पात्र असल्याबाबतचे वैद्यकीय प्रमाणपत्र असणे व कर्मचाऱ्याने सेवाप्रवेशोत्तर प्रशिक्षण परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक आहे . त्याचबरोबर कर्मचाऱ्याचा सेवा अभिलेख यांमध्ये गोपनिय अहवाल , उपस्थिती , सचोटी इत्यादी चांगले असणे आवश्यक आहे .
स्थायित्व प्रमाणपत्र देण्या अगोदर जर एखाद्या कर्मचाऱ्याची बदली , पदोन्नती त्याचबरोबर अन्यत्र सामावून घेण्याची कार्यवाही झाली असेल तर सदर कर्मचारी नियुक्तीपासून कार्यरत असलेल्या कार्यालयाकडून / कार्यालयांकडून वरील अटींची पुर्तता संबंधित कर्मचारी करीता होता किंवा कसे याबाबतची माहिती त्यांच्या सध्याच्या कार्यालयाने उपलब्ध करुन घेवून अशा कर्मचाऱ्यास तो पात्र ठरत असलेल्या पुर्वीच्या पदाचे स्थायित्व प्रमाणपत्र दिले जाते .
या संदर्भातील सविस्तर शासन परिपत्रक पुढीलप्रमाणे पाहु शकता ..
या संदर्भात सा. प्र.विभागांकडून निर्गमित सविस्तर सुधारित शा. परिपत्रक डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करावेत ..
आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.