Spread the love

लाईव्ह मराठी पेपर , संगिता पवार : राज्य शासनांकडुन राज्यातील कर्मचाऱ्यांना निवृत्तीवेतन संदर्भात अखेर मोठा शासन निर्णय दिनांक 24 ऑगस्ट 2023 रोजी घेण्यात आला आहे . परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजना / राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणाली अंतर्गत कर्मचाऱ्यांचा सेवा कालावधीत मृत्यु झाल्यास त्याच्या कुटुंबियांना कुटुंब निवृत्तीवेतन आणि मृत्यु उपदान व रुग्णता सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्याला रुग्णता निवृत्तीवेतन आणि सेवानिवृत्ती उपदान बाबतची कार्यपद्धती बाबत सविस्तर शासन निर्णय वित्त विभागांकडून निर्गमित करण्यात आलेला आहे .

वित्त विभागाच्या संदर्भाधिन शासन निर्णयास अनुसरुन परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजना / राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणाली अंतर्गत असलेल्या कर्मचाऱ्याच्या मृत्युपश्चात त्याचे कुटुंबाने संदर्भाधिन शासन निर्णयासोबतच्या नमुना – 3 नुसान महाराष्ट्र नागरी सेवा ( निवृत्तीवेतन ) नियम 1982 प्रमाणे निवृत्तीवेतनाचा लाभ मिळण्याबाबतच्या विकल्पाची निवड केली असल्यास त्यानुषांगाने कुटुंब निवृत्तीवेतन आणि मृत्यु उपदान अनुज्ञेय करण्याकरीता सदर शासन निर्णयासोबत जोडलेल्य परिशिष्ट – 1 प्रमाणे कार्यवाही करण्यात येणार आहे .

परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजना / राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणाली अंतर्गत रुग्णता निवृत्त झालेला कर्मचारी महाराष्ट्र नागरी सेवा ( निवृत्तीवेतन ) नियम 1982 अंतर्गत रुग्णता निवृत्तीवेतन मिळण्यास पात्र ठरत असल्यास व सदर कर्मचाऱ्याने संदर्भाधीन शासन निर्णयास अनुसरुन रुग्णता निवृत्तीवेतन अनुज्ञेय करणे या विकल्पाची निवड केली असल्यास , त्यानुषंगाने रुग्णता निवृत्तीवेतन आणि सेवानिवृत्ती उपदान अनुज्ञेय करण्यासाठी सोबत जोडलेल्य परिशिष्ट -2  प्रमाणे कार्यवाही करण्यात येणार आहे .

परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजना / राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणाली अंतर्गत सेवेत असलेल्या कर्मचाऱ्याने संदर्भाधीन शासन निर्णयास अनुसरुन त्या सोबतच्या नमुना – 2 नुसार महाराष्ट्र नागरी सेवा नियम 1982 प्रमाणे रुग्णता निवृत्तीवेतन / कुटुंब निवृत्तीवेतनाचा लाभ मिळण्याबाबतच्या विकल्पाची निवड केली असल्यास त्या अनुषंगाने रुग्णता निवृत्तीवेतन / कुटुंब निवृत्तीवेतन आणि सेवानिवृत्ती उपदान / मृत्यू उपदान अनुज्ञेय करण्यासाठी सोबत जोडलेल्य परिशिष्ट -3 प्रमाणे कार्यवाही करण्यात येणार आहे .

तसेच महाराष्ट्र नागरी सेवा नियम 1982 मधील नियम 132 मध्ये नमुद केल्यानुसार शासनाला येणे असलेल्या रकमा प्रथमत :  सेवानिवृत्ती उपदान / मृत्यु उपदान यामधून वसूल करण्यात येणार आहेत . तसेच शासनाच्या सेवेतून निवृत्त झालेल्या / होणाऱ्या कर्मचाऱ्यांचा सेवानिवृत्ती उपदानाचा प्रस्ताव सोबतच्या नमुन्यात परिपुर्ण भरुन मूळ सेवापुस्तकासह उपदानाच्या मंजूरीसाठी महालेखापाल कार्यालयास सादर करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत .

तसेच सदर शासन निर्णयास अनुसरुन मंजूर करण्यात येणारे कुटुंब निवृत्तीवेतन व मृत्यु उपदान / रुग्णता निवृत्तीवेतन व सेवानिवृत्ती उपदान याबाबतचे प्रस्ताव वित्त विभागाच्या दिनांक 02.07.2015 च्या शासन निर्णयानुसार ऑनलाईन पद्धतीनेच सादर करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत .

राज्यातील जिल्हा परिषदा , मान्य्ता प्राप्त व अनुदानित अशासकीय प्राथमिक व माध्यमिक शाळा , कृषीतर विद्यापिठे व त्यांच्याशी संलग्नित मान्यता प्राप्त व अनुदानित अशासकीय महाविद्यालये तसेच कृषी विद्यापीठे व तत्सम अनुदानित संस्थामधील कर्मचाऱ्यांना सदर निर्णय योग्य त्या फेरफरांसह लागू असणार आहेत .

या संदर्भात वित्त विभागांकडून दिनांक 24 ऑगस्ट 2023 रोजी निर्गमित करण्यात आलेला सविस्तर शासन निर्णय डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करावेत ..

शासन निर्णय

आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच इतर पात्र कर्मचारी त्याचबरोबर सेवानिवृत्त पेन्शनधारक  / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *