Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ State Employee Payment GR Dated 28.12.2023 ] : राज्यातील अधिकारी व कर्मचारी यांचे वेतन अदा करण्यासाठी सदर पदे अनिवार्य खर्च ( Committed Expenditure ) लेखाशिर्षामध्ये समाविष्ट करण्यास व त्याकरीता सदर लेखाशिर्षाखाली आर्थिक तरतुद करण्यास मान्यता देणेबाबत , शालेय शिक्षण व क्रिडा विभागांकडून दिनांक 28 डिसेंबर 2024 रोजी महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे .
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 1986 मध्ये शिक्षकांच्या प्रशिक्षणांना प्राधान्य देण्यात आल्याने केंद्र शासनाने देशातील प्रत्येक जिल्ह्यात जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था स्थापन करण्याची शिफारस केली होती , त्यानुसार शिक्षक शिक्षण पुर्नरचना ही केंद्र पुरस्कृत योजना सुरु करण्यात येवून सदर योजना अंतर्गत जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थांच्या स्थापनेच्या अनुषंगाने केंद्र शासनाच्या मनुष्यबळ विकास मंत्रालयाने एकुण 33 जिल्ह्यात जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थांची स्थापना करण्यात आली आहे .
सदरच्या शासन निर्णयानुसार , राज्यातील जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थामधील अधिकारी व कर्मचारी यांचे वेतन राज्य शासनामार्फत अदा करण्यासाठी सदर पदे कार्यक्रमावरील खर्च ( Scheme Expenditure ) लेखाशिर्ष 2202 आय 612 ( सर्वसाधारण ) , 2202 आय 755 ( अनुसूचित जाती प्रवर्ग ) व 2202 आय 657 ( अनुसुचित जमाती घटक ) मधून अनिवार्य खर्च ( Committed Expenditure ) लेखाशिर्ष 22021115 मध्ये समाविष्ट करण्यास मान्यता देण्यात येत आहे .
सन 2024-25 या आर्थिक वर्षापासून राज्यातील जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थामधील अधिकारी व कर्मचारी यांचे वेतनाकरीता विभागाकडील अनिवार्य खर्च ( Committed Expenditure ) लेखाशिर्ष 2202 1115 खाली आर्थिक तरतुद करण्यात मान्यता देण्यात येत आहे .
या संदर्भात शालेय शिक्षण व क्रिडा विभागांकडून दिनांक 28 डिसेंबर 2023 रोजी निर्गमित करण्यात आलेला सविस्तर GR पुढीलप्रमाणे पाहु शकता ..
आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.