Live Marathipepar , संगिता पवार प्रतिनिधी : दिनांक 01.11.2005 रोजी किंवा त्यानंतर नियुक्त नियुक्त झालेल्या व परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजना ( DCPS ) / राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना ( NPS ) लागु असलेल्या अधिकारी / कर्मचाऱ्यांना वित्त विभागाच्या दिनांक 31.03.2023 च्या शासन निर्णयातील तरतुदी लागु करणेबाबत पाणी पुरवठा व स्वच्छता विभाागांकडून दिनांक 17 ऑक्टोंबर 2023 रोजी अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे .
महाराष्ट्र जीवन प्राधिकरण प्राधिकरण मध्ये दिनांक 01 नोव्हेंबर 2005 रोजी किंवा त्यानंतर सेवेत नियुक्त झालेल्या व परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजना / राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना लागु असणाऱ्या अधिकारी / कर्मचाऱ्यांना राज्य शासनांच्या वित्त विभागांकडून दि.31.03.2023 रोजी निर्गमित करण्यात आलेल्या तरतुदी लागु करण्यास सदर शासन निर्णयाप्रमाणे मंजुरी देण्यात आलेली आहे .
यांमध्ये नमुद करण्यात आलेले आहेत कि , कर्मचारी सेवेत असतानाच मृत्यु झाल्यास ,त्यांच्या कुटुंबाला निवृत्तीवेतन आणि मृत्यु उपदान मंजुर करण्यात येईल , तसेच रुग्णता सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना रुग्णता निवृत्तीवेतन तसेच सेवानिवृत्ती उपदान लागु करण्यात येत आहेत .त्याचबरोबर कुटुंब निवृत्तीवेतनधारकास व रुग्णता निवृत्तीवेतनधारकास निवृत्तीवेतन नियम 1982 मधील तरतुदीप्रमाणे कुटुंब निवृत्तीवेतन / रुग्णता निवृत्तीवेतन लागु असणार आहे .
परंतु सदर राज्य शासनांच्या वित्त विभागाकडून दिनांक 29.09.2018 रोजीच्या निर्णयातील लागु करण्यात आलेल्या अनुदान योजना प्राधिकरण मधील कर्मचाऱ्यांना लागू असणार नाहीत . तसेच दिनांक 01 नोव्हेंबर 2005 ते सदर शासनल निर्णय निर्गमित होईपर्यंत मृत्यु पावलेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबास मृत्यु उपदान तसेच कुटुंब निवृत्तीवेतनाची थकबाकी , नियमित कुटुंब निवृत्तीवेतन मिळण्यासाठी सदरच्या GR मध्ये नमुद करण्यात आलेला नमुना क्र.3 मीधल विकल्प हा संबंधित कार्यालय प्रमुखांकडे भरुन सादर करायचा आहे .
तसेच जे कर्मचारी महाराष्ट्र नागरी सेव निवृत्तीवेतन नियम 1982 नुसार रुग्णता निवृत्तीवेतन किंवा कुटुंबनिवृत्तीवेतन योजना ( Family Pension ) अनुज्ञेय करणे संदर्भात विकल्प सादर करतील अशांना नमुना क्र.01 नुसार कुटुंबाचा तपशिल सादर करणे अनिवार्य असल्याचे नमुद करण्यात आलेले आहे .
या संदर्भातील सविस्तर पाणी पुरवठा व स्वच्छता विभागांकडून निर्गमित करण्यात आलेला सविस्तर शासन निर्णय डाऊनलोड करणेकामी खालील लिंकवर क्लिक करावेत ..
आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.