सातवा वेतन आयोगाच्या तिसरा हप्त्याची रक्कम वितरीत करणेबाबत राज्य शासनांच्या नगरपरिषद प्रशासन संचालनालय विभागांकडून दि.19 मे 2023 रोजी अत्यंत महत्वपुर्ण शासन परिपत्रक निर्गमित करण्यात आलेला आहे .सदर शासन परिपत्रकान्वये नमुद कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोगाचा 3 रा हप्त्याची रक्कम वितरीत करण्याचे आदेश देण्यात आले आहेत .
सदर शासन परिपत्रकानुसार राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये कार्यरत कर्मचाऱ्यांना 7 वा वेनत आयोगाच्या तिसऱ्या हप्त्याची रक्कम वितरीत करण्याचे आदेश देण्यात आले आहेत . राज्यातील नगरपरिषदांना जकात कर व महागाई भत्ता रद्द केल्यामुळे त्याऐवजी सदर नगरपरिषदांना सहायक अनुदान वितरीत करण्यात येते . सदर प्रायोजनार्थ सन 2023-24 या आर्थिक वर्षाकरीता मागणीनुसार जकात कर व महागाई भत्ता रद्द केल्यामुळे नगरपरिषदांना द्याववयाचे सहायक अनुदाने 2695,44,00,000/- अर्थसंकल्पिय तरतूद मंजुर करण्यात आलेली आहे .
शासन अधिसूचना वित्त विभाग दि.30.01.2019 अन्वये सातव्या वेतन आयोगाची थकबाकी सन 2019-20 पासून पुढील पाच वर्षात पाच समान हप्त्यांत कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधी योजनेच्या खात्यात जमा करण्याचा आणि सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना रोखीने अदा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे .या संदर्भात कार्यपद्धती शासन परिपत्रक वित्त विभाग दि.20.02.2019 नुसार विहीत करण्यात आले आहे .
हे पण वाचा : राज्य कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय 60 वर्षे होणार !
त्याचबरोबर राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना अथवा परिभाषित अंशदायी निवृत्तीवेतन योजना लागु असलेल्या कर्मचाऱ्यांच्या थकबाकी रक्कम पाच वर्षात पाच समान हप्त्यांत रोखीने अदा करण्याबाबत शासन परिपत्रक दि.30.05.2019 नुसार सूचना निर्गमित करण्यात आलेल्या आहत . राज्य शासनांच्या दि.09.05.2022 रोजीच्या आदेशान्वये राज्यातील शासकीय व इतर पात्र कर्मचारी आणि सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना दिनांक 01 जुलै 2021 रोजी देय असलेल्या सातव्या वेतन आयोगाच्या थकबाकीच्या तिसऱ्या हप्त्याचे प्रदान करणेबाबत मान्यता देण्यात आलेली आहे .
सातवा वेतन आयोगाचा तिसरा हप्ता अदा करणे संदर्भात नगरपरिषद प्रशासन संचालनालय विभांगाकडून दि.19 मे 2023 रोजी निर्गमित करण्यात आलेला सविस्तर शासन परिपत्रक डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करावे .
शासकीय कर्मचारी , नोकर पदभरती व इतर घडामोडींच्या अपडेट करीता Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !