Spread the love

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ State Employee Sevanivruitti Upadan ] : राज्य शासन सेवेतील कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीनंतर सेवानिवृत्ती उपदान अदा करण्यात येते . सेवानिवृत्ती उपदान कोणत्या कर्मचाऱ्यांस प्राप्त होतो , व कोणत्या प्रमाणात मिळतो या बाबत सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे पाहुयात ..

अर्थ व पात्रता : राज्य कर्मचाऱ्यांस सेवानिवृत्त झाल्याबरोबर एकरकमी जी उपदानाची रक्कम मिळते त्याला सेवानिवृत्ती उपदान असे म्हणतात . सेवानिवृत्ती उपदानाची रक्कम हा देखिल निवृत्तीवेतनाचा भाग संबोधला जातो . ज्यांची सेवा किमान पाच वर्षे झालेली आहे , अशा कर्मचाऱ्यांस सेवानिवृत्ती उपदान प्रदान करण्यात येते .

कर्मचाऱ्यांने पुर्ण केलेल्या अहर्ताकारी सेवेच्या प्रत्येक सहामाही कालावधीकरीता वेतनाच्या ¼ रक्कम ही सेवानिवृत्ती उपदान म्हणून दिली जाते . परंतु ही मर्यादा त्याच्या अंतिम वेतनाच्या 16 ½ महिन्याचे वेतन अशी ठरविण्यात आलेली आहे . तर सुधारित वित्त विभागाच्या दिनांक 16 जानेवारी 2016 नुसार ही कमाल रक्कम 14 लाखापर्यंत दिली जाईल .म्हणजेच सेवानिवृत्त उपदानाची कमाल मर्यादा ही 14.00 लाखापर्यंत करण्यात आलेली आहे .

सेवानिवृत्ती उपदानाची रक्कम काढण्यासाठी चे सुत्र : अंतिम वेतन / 4 X पुर्ण अर्ध सहामाही कालावधी ( एकुण सेवा वर्षे X 2 )

कर्मचारी सेवा काळांमध्ये मृत्यु झाल्यास त्यास सेवाकालावधीनुसार मृत्यू उपदान देण्यात येतो . जर सेवाकाळ 01 वर्षापर्यंत असल्यास उपदानाची रक्कम ही अंतिम वेतनाच्या 2 पट देण्यात येते , तर सेवा कालावधी हा 01 ते 05 वर्षे पर्यंत असल्यास अंतिम वेतनाच्या 06 पट उपदानाची रक्कम अदा करण्यात येते , तर सेवा कालावधी हा 05 वर्षे ते 11 वर्षापर्यंत असल्यास ,

उपदानाची रक्कम ही अंतिम वेतनाच्या 12 पट असते . तर सेवा कालावधी हा 11 वर्षापेक्षा अधिक व 20 वर्षापर्यंत असल्यास अंतिम वेतनाच्या 20 पट उपदानाची रक्कम मिळेल .तर सेवा कालावधी 20 वर्षापेक्षा अधिक असल्यस अंतिम वेतनाच्या पुर्ण केलेल्या प्रत्येक सहामाही करीता  50 टक्के , मात्र 33 महिन्यांचे वेतन अथवा 14 लाख मर्यादेपर्यंत उपदानाची रक्कम अदा करण्यात येईल .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *