Spread the love

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Government Employee Rules ] : शासकीय कर्मचारी हा सेवेत रुजु झाल्यापासून ते सेवानिवृत्त होईपर्यंत शासनांचा एक नोकर म्हणून कार्य करत असतो , त्यामुळे त्यांस शासनांने घालून दिलेले अनेक नियम पाळावे लागतात . त्याचे वैयक्तिक आयुष्य जगत असताना देखिल काही नियमांचे पालन करणे अत्यावश्यक असते , याबाबतची सविस्तर नियमावली पुढीलप्रमाणे पाहुयात ..

यांमध्ये शासकीय कर्मचाऱ्या कोणत्याही कृतीमुळे धार्मिक , वांशिक , जातीय , प्रादेशिक वा विभिन्न जातींमध्ये तिरस्काराची भावना निर्माण होईल अशा पद्धतीचे कृती मध्ये भाग घेणार नाहीत , अशा प्रकारीचे नियम घालुन देण्यात आलेले आहेत . तसेच शासकीय कर्मचारी हा शासनाच्या पुर्व परवानगीशिवाय आपले नाव हे एखाद्या शाळा / तत्सम संस्था , ग्रंथालये , रस्ता यांच्या जोडण्यास अनुमती देणार नाहीत . त्याचबरोबर बक्षिस , पदके / चषक यांच्याशी देखिल आपले नाव जोडण्यास संमती देणार नाहीत .

विवाह बाबीविषक : कोणताही शासकीय कर्मचारी हा दोन विवाह करु शकणार नाही , अथवा अगोदरच विवाहीत असणाऱ्या ( लग्नबंधात असणाऱ्याशी )  व्यक्तीशी विवाह करु शकणार नाहीत . त्याचबरोबर भारताचे नागरिकत्व नसणाऱ्या व्यक्तीशी विवाह करायला असल्यास , शासनांस तसे पुर्वी कळविणे आवश्यक असेल . त्याचबरोबर लग्नामध्ये प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्षपणे हुंडा घेणार नाही , किंवा देवू शकणार नाही , यांमध्ये हुंडा प्रतिबंधक कायदा 1961 प्रमाणे कार्यवाही होईल .

मादक पदार्थ्यांचे सेवण : शासकीय कर्मचारी हा कामावर असताना कोणत्याही मादक पेय / पदार्थांचे सेवक करणार नाही . तसेच सार्वजनिक ठिकाणी मादक पदार्थ्यांचे सेवण टाळावेत , तसेच प्रमाणाबाहेर सेवण करणार नाहीत . तर नशा केलेल्या अवस्था मध्ये कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी वावरणार नाही . याचाच अर्थ सरकारी कर्मचारी कामाच्या ठिकाणी तसेच सार्वजनिक ठिकाणी मादक पदार्थ्यांचे सेवण करु शकणार नाहीत .

लैंगिक छळवाद : कोणताही शासकीय पुरुष कर्मचारी कामाच्या ठिकाणी कोणत्याही महिलेशी प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष लैंगिक छळवाद होईल , अशा प्रकारचे वर्तन करणान नाही , याकरीता कार्यालय प्रमुखांने लैंगिक छळवाद प्रतिबंध करण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना केल्या पाहिजेत .

आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *