लाईव्ह मराठी पेपर , प्रणित पवार : महाराष्ट्र राज्य शासन सेवेतील कर्मचारी संदर्भात संधारित शासन निर्णय / परिपत्रके इत्यादी बाबीसंदर्भात अत्यंत महत्वपुर्ण संकलन पुस्तिका निर्गमित करण्यात आलेली आहे , सदर संकलन पुस्तिकांमध्ये कर्मचारी संदर्भात आतापर्यंत निर्गमित करण्यात आलेले सर्व सुधारित GR / परिपत्रके यांचे संकलन करण्यात आलेले आहेत .
आगाऊ वेतनवाढी – यांमध्ये शासकीय कर्मचाऱ्यांस अत्युत्कृष्ट कामानिमित्त आगाऊ वेतनवाढ मंजुर करण्यात येते , तसेच शासकीय कर्मचाऱ्यास कालबद्ध पदोन्नती योजना अंतर्गत वरिष्ठ वेतनश्रेणी मंजूर केल्यानंतर आगाऊ वेतनवाढ अनुज्ञेय करण्यात येते . तसेच पोलिस पदके मिळणाऱ्या पोलिस अधिकारी / कर्मचारी यांना अग्रीम वेतनवाढी देण्यात येते . तर राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय खेळ स्पर्धामधील सहभागामुळे राज्य शासकीय कर्मचारी यांना द्यावयाच्या अतिरिक्त वेतनवाढ / वेतनवाढी व अनुपस्थितीचा कालावधी नियमित करणेबाबत वित्त / गृह विभागांकडून सुधारित शासन निर्णये / परिपत्रके निर्गमित करण्यात आलेले आहेत .
प्रवास अग्रीम , सवलतीचा गैरवापर प्रवास भत्ता , रजा प्रवास सवलत इ. : शासकीय अधिकारी / कर्मचाऱ्यांना स्वगा्रमी जाण्यासाठी प्रवास सवलत अदा करण्यात येते , रजा प्रवासाच्या सवलत खाजगी वाहनांचा वापर केल्यास देखिल अनुज्ञेय करण्यात येते . कार्यभार क्षेत्राच्या बाहेर दौरा करण्याकरीता आणि नैमित्तिक रजा घेण्याकरीता सक्षम प्राधिकाऱ्यांची पुर्वीच मंजुरी मिळणे आवश्यक असते .
वैद्यकीय खर्चाची प्रतिपुर्ती , वैद्यकीय अग्रीम ई : तात्काळ परिस्थितीत खाजगी रुग्णालयात घेतलेल्या वैद्यकीय उपचारांच्या खर्चाची प्रतिपुर्ती , सुधारित वेतनमानाप्रमाणे वैद्यकिय प्रतिपुर्तीचे सुधारित प्रमाण याबाबत सार्वजनिक आरोग्य विभागांकडून सुधारित शासन निर्णय दि.12.10.1983 रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे . तसेच वैद्यकीय अग्रीम मंजर करण्याा संबंधातील अटी बाबत सा.आरोग्य विभागाच्या दिनांक 27.008.1984 नुसार शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे .
अग्रीमांमध्ये अपंग राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना तीन चाकी स्वयंचलित सायकल खरेदी करण्याकरीता प्राधान्य क्रमाणे अग्रीमे दिली जातात , तर वित्तीय संस्थांकडून घरबांधणीच्या प्रयोजनासाठी घेतलेल्या कर्जाची परतफेड करण्यासाठी घरबांधणी अग्रीम मंजुर करण्यात येते . तसेच संगणक खरेदी ,वाहन खरेदी करीता अग्रीमे मंजुर करण्यात येते , तसेच दिवाळी / ईद / ख्रिसमस सणानिमित्त सन साजरी करण्यासाठी कर्मचाऱ्यांना अग्रिमे मंजूर करण्यात येते .
शासन निर्णय / परिपत्रके पुस्तिका डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करावेत ..
शासन निर्णय /परिपत्रक पुस्तिका
आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !