Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ state employee service book related information pdf ] : राज्य कर्मचाऱ्यांच्या सेवा पुस्तक विषयक संक्षिप्त माहिती पीडीएफ स्वरुपात डॉ.भानुदास सि.जटार सहायक संचालक स्थानिक निधी लेखा परीक्षा यांच्या मार्फत प्रकाशित करण्यात आलेली आहे .
सदर माहिती पुस्तिकांमध्ये सेवापुस्तक विषयक सर्वसाधारण माहिती देण्यात आलेली आहे , सदर सेवा पुस्तक हे महाराष्ट्र नागरी सेवा नियम 1981 मधील नियम 36 परिशिष्ट – 4 नुसार नमुना विहीत करण्यात आलेला आहे .
सेवा पुस्तकाचे उपविभाग : सेवा पुस्तकाच्या उपविभागामध्ये प्रमुख 05 उपविभाग विभागले आहेत . यांमध्ये पहिले पान , नियुक्ती तपशिल , रजेचा हिशोब , अर्हताकारी सेवेशी प्रत्यक्षपणे संबंधित असलेल्या घटनांचा तपशिल व सेवा पडताळणी यांचा समावेश होतो .
पहिल्या पानावरील नोंदी : पहिल्या पानावरील नोंदी मध्ये जन्म तारीखेची नोंद , तसेच धर्म व जात नमुद करताना मुळ जात नमुद करण्याचे नमुद आहेत , तसेच ज्या प्रवर्गातुन सेवेस लागले आहे त्याचाही कंसामध्ये उल्लेख नमुद आहे . तसेच शैक्षणिक अर्हता , वडीलांचे नाव व मुळ राहण्याचे ठिकाण व वैद्यकीय प्रमाणपत्रांची नोंद करणे आवश्यक असते .
रजा व तत्सम नोंदी : राज्य शासनांच्या वित्त विभाग शासन निर्णय 09.11.1990 नुसार आगाऊ जमा करावयाच्या रजा नोंदी कर्मचाऱ्याने वेळोवेळी उपभोगलेल्या व मंजूर करण्यात आलेल्या रजा नोंदी रजा मंजूर आदेश रजा लेखा नोंदीसह नमुद करण्याची तरुद आहे , तसेच स्वग्राम / महाराष्ट्र दर्शन रजा सवलत घेतल्याची नोंद नमुद आहे . तसेच बाल संगोपन रजेचा स्वतंत्र रजा लेखा ठेवणे आवश्यक असते .
विविध नामनिर्देशन : विविध नामनिर्देशनांमध्ये गट विमा योजना , भविष्य निर्वाह निधी , निवृत्तीवेतन , मृत्यू नि सेवा उपदान , डीसीपीएस / एनपीएस , अपघात विमा योजना , कुटुंब प्रमाणपत्र यांच्या नामनिर्देशनांची नोंद सेवा पुस्तकांमध्ये करणे आवश्यक असते .
याशिवाय नियमित बाबी / घटना , सेवा निवृत्तीनंतरच्या नोंदी , विविध अग्रीमे नोंदी , सेवापुस्तकाची वार्षिक पडताळणी , इतर महत्वाच्या सुचना , सेवा पुस्तकांना चिकटवायचे महत्वाचे दस्तावेज ,सेवापुस्तकातील महत्वाचे आक्षेप यांची नोंद करणे आवश्यक असते , त्याविषयक सविस्तर माहिती सदर पुस्तिकामध्ये नमुद करण्यात आलेली आहे .
आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.