Spread the love

Live Marathiepepar संगिता पवार प्रतिनिधी [ State Employee Second Service Book & Main Service Book lost information ] : राज्य शासन सेवेत कार्यरत कर्मचाऱ्यांचे मुळ सेवापुस्तक अद्यावत ठेवण्याची जबाबदारी ही कार्यालय प्रमुख / विभाग प्रमुख / प्रादेशिक कार्यालय प्रमुखांची असते . तर दुय्यम सेवापुस्तक ठेवणे , तसेच जर मुळ सेवापुस्तक गहाळ झाल्यास काय करावेत या संदर्भातील सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे पाहुयात ..

दुय्यम सेवापुस्तक : दुय्यम सेवापुस्तक तयार करुन त्यांमध्ये मुळ सेवापुस्तकांवरुन सर्व नोंदी घेवून कार्यालय प्रमुख / विभाग प्रमुख / प्रादेशिक प्रमुखांकडून साक्षांकित करुन घ्यावेत , तर दुय्यम सेवापुस्तक हे कर्मचाऱ्यांच्या सुपुर्त करण्यात येते , त्यांमध्ये सर्व नोंदी तसेच स्वाक्षरी आवश्यक कागतपत्रे चिटकवावेत .  दरवर्षी माहे सप्टेंबर अखेरीस वित्तीय वर्षनिहाय मुळ सेवा पुस्तकांमधील नोंदी दुय्यम सेवापुस्तकांमध्ये करण्यात येते .

मुळ सेवापुस्तक गहाळ होणे : मुळ सेवापुस्तक गहाळ झाल्यास , किंवा अन्य काही नैसर्गिक आपत्तीमुळे नाहीशे झाले असता , त्या संदर्भातील अधिकृत अहवाल नियंत्रण अधिकाऱ्यांस सादर केले जाते . त्यानंतर दुय्यम सेवा पुस्तकाच्या आधारे मूळ सेवा पुस्तक नविन तयार करणे बाबत आदेश नियंत्रक अधिकाऱ्यांकडून दिले जाईल अथवा दुय्यम सेवा पुस्तक हेच मुळ सेवापुस्तक म्हणून समजण्याचे आदेश दिले जाईल .

दुय्यम सेवापुस्तक हे मुळ सेवापुस्तक झाल्यास , सदर सेवापुस्तक हे कार्यालयाच्या दप्तरी ठेवले जाईल व परत दुय्यम सेवापुस्तक तयार करुन कर्मचाऱ्यांनी आपल्याकडे ठेवावेत .

दुय्यम सेवापुस्तक नसणे / मुळ सेवापुस्तक नष्ट होणे : मुळ सेवापुस्तक नष्ट झाले असतील व दुय्यम सेवा पुस्तक देखिल ठेवले नसतील अशा प्रकरणी मुळ सेवा पुस्तक तयार करण्यासाठी कर्मचारी पुर्वी ज्या ज्या आस्थापनेवर काम केले आहेत , अशा सर्व कार्यालयांमधून वेतनपट , वैयक्तिक नस्ती , कर्मचाऱ्यांच्या सोबत पुर्वी एकत्र काम केलेल्या कर्मचाऱ्यांकडून घोषणापत्र घेणे अथवा आपल्या नियंत्रण अधिकाऱ्यांकडून मुळ सेवापुस्तक तयार करण्याचे आदेश पारित करुन विनाविलंब मुळ सेवापुस्तक तयार केले जाईल .

आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *