लाईव्ह मराठी पेपर , प्रणिता पवार : सध्या महाराष्ट्र शासनाच्या विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन मुंबई येथे सुरू आहे . या पावसाळी अधिवेशनामध्ये कर्मचारी, शेतकरी, नागरिक यांच्यासाठी अनेक मोठे हिताचे निर्णय घेण्यात येत आहेत . यामध्ये राज्यातील “या ” कर्मचाऱ्यांसाठी एक मोठा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे .
दिनांक 28 जुलै 2023 रोजी विधिमंडळामध्ये कृषी सेवकांच्या मानधनांमध्ये वाढ करणे संदर्भात प्रस्ताव चर्चेसाठी मांडण्यात आला , या प्रस्तावास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंजुरी दिली असून , कृषी सेवकांच्या मानधनात चक्क दहा हजार रुपयांची वाढ करण्यात आली आहे . यापूर्वी राज्य शासनाकडून सन 2004 पासून “कृषी सेवक ” हे पद निर्माण करण्यात आले .
त्यावेळी सदर कृषी सेवक कर्मचाऱ्यांना 2,400 रुपये एवढे मानधन निश्चित करण्यात आले . त्यानंतर सन 2012 मध्ये कृषी सेवकांच्या मानधनात परत एकदा वाढ करण्यात आली असून , 2400 वरून सहा हजार रुपये इतके मानधन करण्यात आले . त्यानंतर कृषी सेवकांच्या मानधनात आता जवळपास बारा वर्षे नंतर वाढ करण्यात आली आहे ..
हे पण वाचा : July Payment : राज्य कर्मचाऱ्यांना जुलै महिन्याचे वेतनासोबत मिळणार हे तीन आर्थिक लाभ !
आता कृषी सेवक कर्मचाऱ्यांना प्रति महा 16 हजार रुपये इतके मानधन दिले जाणार आहे . राज्य सरकारच्या या निर्णयामुळे कृषी सेवकांना मोठा आर्थिक दिलासा मिळाला आहे , त्याचबरोबर यापूर्वीच शिक्षण सेवकांच्या मानधनांमध्ये मोठी वाढ करण्यात आलेली आहे ..
तसेच राज्यातील अंगणवाडी सेविका , मदतनीस पदांच्या मानधनांमध्ये वाढ करणे राज्य शासनाकडून प्रस्तावित असल्याची माहिती समोर येत आहे , यामुळे राज्यातील कर्मचाऱ्यांना वाढत्या महागाईच्या दृष्टीने पगारामध्ये मोठा आर्थिक दिलासा मिळत आहे .
आपण जर शासकीय -निमशासकीय कर्मचारी ,शिक्षक -शिक्षकेतर कर्मचारी ,इतर पात्र कर्मचारी ,तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक /कुटुंब निवृत्तीवेनधारक असाल तर, व्हाट्सअप ग्रुप मध्ये जॉईन व्हा !
- SSC / HSC महाराष्ट्र राज्य फेब्रु/ मार्च बोर्ड परीक्षा 2024 वेळापत्रक प्रसिद्ध ; पाहा / डाऊनलोड करा PDF
- राज्यात दि.27 ते 30 नोव्हेंबर पर्यंत राज्यातील या 09 जिल्ह्यात पावसाची शक्यता ; तर दि 01 ते 04 डिसेंबर काळात अवकाळी पावसाची शक्यता !
- एक्झिट पोलच्या सर्व्हेनुसार निवडुन येणाऱ्या संभाव्य आमदारांची नावे ; या 10 अपक्ष आमदारांचा देखिल समावेश .
- शिक्षकांची वाढीव पदे समायोजन करणेबाबत , महत्वपुर्ण परिपत्रक निर्गमित !
- इ.10 वी / 12 वी बोर्ड परीक्षा वेळापत्रक जाहीर ; जाणून घ्या तोंडी व लेखी परीक्षा वेळापत्रक !