Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ State Employee Retirement /Death / Rajinama Benefit shasan nirnay ] : राजय शासन सेवांमध्ये कार्यरत या कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्ती / राजीनामा / मृत्यु तसेच सेवेतुन काढून टाकणे या संदर्भातील दिनांक 01 एप्रिल 2022 नंतरच्या प्रकरणांना राज्य शासनांमार्फत लाभ देणेसंर्भात महीला व बाल विकास विभागांकडून दिनांक 26 फेब्रुवारी 2024 रोजी अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे .
सदरच्या शासन निर्णयान्वये राज्यातील एकात्मिक बाल विकास सेवा योजना अंतर्गत अंगणवाडी सेविका , मदतनीस व मिनी अंगणवाडी सेविका या अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या दिनांक 01 एप्रिल 2022 पासून ते ग्रॅच्युईटी लागु करण्या बाबतचा धोरणात्मक निर्णय होईपर्यंतच्या कालावधीतील सेवानिवृत्ती / मृत्यु / राजीनामा / सेवेतुन काढून टाकणे इत्या प्रकरणी एकरकमी लाभ शासना मार्फत बाल विकास सेवा योजना आयुक्तालयाकडून महिला व बाल विकास विभागाच्या दिनांक 30.04.2014 रोजीच्या शासन निर्णयांमध्ये नमुद करण्यात आलेल्या सुत्रानुसार आणि पुर्णपणे शासनामार्फत देण्यास मान्यता देण्यात येत आहेत .
तसेच अंगणवाडी कर्मचाऱ्यांना ग्रॅच्युईटी लागू करण्याबाबत घेण्यात येणाऱ्या धोरणात्मक निर्णयाचा GR निर्गमित केल्याच्या दिनांकापासून महिला व बाल विकास विभागाच्या दिनांक 30.04.2014 रोजीच्या शासन निर्णयानुसार सुरु करण्यात आलेली एकरकमी लाभाची योजना बंद करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे .
त्याचबरोबर दिनांक 30.04.2014 रोजीच्या शासन निर्णयामध्ये नमुद करण्यात आलेल्या सुत्रानुसार , आणि पुर्णपणे शासनामार्फत अंगणवाडी कर्मचाऱ्यांना एकरकमी लाभ मंजूर करण्याकरीता दिनांक 01.04.2022 पासूनच्या एकरकमी लाभाच्या प्रकरणी परिगणना करुन त्याप्रमाणे संबंधित अंगणवाडी कर्मचाऱ्यांस लाभ अदा करण्याची कार्यवाही आयुक्त एकात्मिक बाल विकास सेवा योजना यांनी तात्काळ करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत .
त्याचबरोबर त्या अनुषंगाने दिनांक 01.04.2022 पासूनच्या आतापर्यंतच्या प्रकरणां करीता येणारा सुमारे रुपये 50.00 कोटी एवढा खर्च सदर योजनाच्या संबंधित लेखाशिर्ष खाली उपलब्ध करुन देण्यात येणाऱ्या तरतुदीमधून भागविण्यास मान्यता देण्यात येत आहेत . तसेच यापुढील कालावधीकरीता ग्रॅच्युईटीचा निर्णय होईपर्यंत एकर कमी लाभाच्या प्रकरणांकरीता येणारा खर्च हा संबंधित लेखाशिर्षाखाली उपलबध करुन देण्यात येणाऱ्या तरतुदीमधून भागविण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत .
या संदर्भात महिला व बाल विकास विभागांकडून दिनांक 26 फेब्रुवारी 2024 रोजी निर्गमित करण्यात आलेला सविस्तर शासन निर्णय पुढीलप्रमाणे पाहु शकता ..
आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.