Spread the love

Live marathipepar संगीता पवार प्रतिनिधी [ state employee Retirement date, Retirement age ] : राज्य शासन सेवेमधील गट अ, ब आणि क संवर्गातील कर्मचाऱ्यांचे वयाची 58 वर्ष पूर्ण झाल्यानंतर त्यास सेवानिवृत्त केले जाते . तर संवर्ग ड मधील कर्मचाऱ्यांच्या वयाच्या साठ वर्षे ( 60 वर्षे ) पूर्ण झाल्यानंतर , सेवानिवृत्ती देण्यात येते . ज्या महिन्यांमध्ये वरील नमूद नियत वयमान पूर्ण होईल , त्या महिन्याच्या शेवटच्या दिवशी सदर कर्मचाऱ्यास सेवानिवृत्त केले जाते . ज्या कर्मचाऱ्यांची जन्म तारीख ही एक असेल त्या कर्मचाऱ्यांची सेवानिवृत्तीची तारीख अगोदरच्या महिन्याच्या शेवटच्या दिवशी सेवानिवृत्तीची तारीख ग्राह्य धरली जाते .

न्यायिक अधिकाऱ्यांच्या संदर्भात सेवानिवृत्तीचे वय 60 वर्षे आहे , परंतु वयाच्या 58 वर्षानंतर सदर प्रकरणी पुनर्विलोकन करण्यात येवून सेवेत दोन वर्षे (02 वर्षे ) मुदतवाढ देण्यात येते , तर महाविद्यालयातील प्राचार्याचे सेवानिवृत्तीचे वय 65 वर्ष करण्यात आले आहेत , तर प्राध्यापकांचे सेवानिवृत्तीचे वय 65 वर्ष करण्यात आलेले आहेत .

असे असले तरी सेवानिवृत्तीच्या नियमानुसार ( नियम क्रमांक 10 ) कर्मचाऱ्यांची तीस वर्षे ( 30 वर्षे सेवा ) अर्हताकारी सेवा पूर्ण झाल्यानंतर , राज्य शासनाकडून त्या कर्मचाऱ्यास तीन महिन्यांची ( 03 महिने ) नोटीस देऊन ,सक्तीने सेवानिवृत्त करू शकते , किंवा कर्मचारी स्वतः होवून , शासनास तीन महिन्याची नोटीस देऊन सेवानिवृत्ती स्वीकारू शकतो .

कर्मचाऱ्याची किमान वीस वर्ष ( 20 वर्षे ) सलग सेवा पूर्ण झाल्यानंतर कोणताही राज्य शासकीय कर्मचारी शासनास तीन महिन्याची नोटीस देऊन स्वेच्छा सेवानिवृत्ती स्वीकारू शकतो , अशावेळी अर्हताकारी सेवेमध्ये जास्तीत जास्त पाच वर्षांची वाढ दिली जाते . म्हणजेच कर्मचारी वीस वर्षे सेवेनंतर सेवानिवृत्ती वेतनासाठी पात्र ठरेल .

आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *