Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ State Employee Retirement Before Retirement Age Shasan Nirnay ] : अर्हताकारी सेवेच्या 30 वर्षे अथवा 50/55 व्या वर्षापलिकडे सेवा झालेल्या कर्मचाऱ्यांना मुदपुर्व सेवानिवृत्ती / सेवेत मुदतवाढ देणेबाबत , राज्य शासनांच्या नियोजन विभागांकडून अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे .
महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्तीवेतन नियम 1982 नुसार अनुसार सार्वजनिक हितास्तव अकार्यक्षम , संशयास्पद सचोटीच्या गट अ व गट ब ( राजपत्रित ) अधिकारी यांचे त्यंच्य वयाच्या 50/55 वर्षापलिकडे / अर्हताकारी सेवेच्या 30 वर्षानंतर सेवा पुनर्विलोकन करुन मुदतपुर्व सेवानिवृत्त करण्याबाबत , राज्य शासनांच्या सामान्य प्रशासन विभागांकडून दिनांक 10 जुन 2019 रोजीच्या शासन निर्णयाद्वारे एकत्रित कार्यपद्धती विहीत करण्यात आलेले आहे .
त्यानुसार नियोजन विभागाच्या दिनांक 11.07.2022 रोजीच्या निर्णयानुसार नियोजन विभागाच्या अधिनस्त असणाऱ्या अर्थ व सांख्यिकी संचालनालयाच्या आस्थापनेवारील गट अ व गट ब ( राजपत्रित ) अधिकाऱ्यांची त्यांच्या वयाच्या 50/55 व्या वर्षापलिकडे अथवा ज्यांची अर्हताकारी सेवेची 30 वर्षे पुर्ण झाली आहेत .अशा अधिकाऱ्यांची शासन सेवेत राहण्याची पात्रापात्रता आजमाविण्यासाठी पुनर्विलोकन करुन शिफारस करण्याकरीता राज्य शासनांकडून पुढीलप्रमाणे समितीचे गठण करण्यात आलेले आहेत .
नियोजन विभागाच्या अनिधनस्त असणाऱ्या अर्थ व सांख्यिकी संचालनाच्या आस्थापनेवारील गट अ व गट ब ( राजपत्रित ) अधिकाऱ्यांची त्यांच्या वयाच्या 50/55 व्या वर्षापलिकडे अथवा ज्यांची अर्हताकारी सेवेची 30 वर्षे पुर्ण झालेली आहेत . अशा अधिकाऱ्यांची शासन सेवेत राहण्याची पात्रापात्रता आजमाविण्याकरीता पुनर्विलोकन करुन शिफारस करण्याकरीता पुनर्विलोकन समितीमध्ये अपर मुख्य सचिव / प्रधान / सचिव / सचिव नियोजन विभाग हे अध्यक्ष असणार आहेत .
तर सहसिचव / उपसचिव व श्रीमती दीपा ठाकूर , उपसचिव नियोजन विभाग हे सदस्य असणार आहेत , तर अवर सचिव नियोजन विभाग हे सदस्य सचिव असणार आहेत . या संदर्भातील नियोजन विभागांकडून दिनांक 02.01.2024 रोजी निर्गमित करण्यात आलेला सविस्तर शासन निर्णय पुढीलप्रमाणे पाहु शकता ..
आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.