Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ State Employee Retirement Before Retirement Date Shasan Nirnay ] : राज्य शासनांच्या सामान्य प्रशासन विभागाच्या महाराष्ट्र नागरी सेवा ( निवृत्तीवेतन ) नियम 1982 च्या नियम 10(4) व नियम 65 नुसार सार्वजनिक हितास्तव अकार्यक्षम व संशयास्पद सचोटीच्या अधिकारी / कर्मचाऱ्यांना वयाच्या 50/55 व्या वर्षी अथवा 30 वर्षी अर्हता कारी सेवा यापैकी जे अगोदर घडेल त्यावेळी , सदर कर्मचाऱ्यांच्या सेवा पुनर्विलोकन करुन मुदतपुर्व सेवानिवृत्ती करण्याच्या एकत्रित कार्यपद्धती विहीत करण्यात आलेली आहे .
राज्य शासनांच्या विधी व न्याय विभागाच्या समक्रमांकाच्या दिनांक 13.10.2023 रोजीच्या शासन निर्णयातील परिशिष्ठ – ड मधील अनुक्रमांक 4 नुसार पुनर्विलोकन समितीच्या शिफारीशनुसार सेवा पुनर्विलोकनांतर मुदतपुर्व सेवानिवृत्तीच्या निर्णयाविरुद्धच्या अभिवेदनावर विचार करण्याकरीता अभिवेदन समिती गठीत करण्याची बाब राज्य शासनाच्या विराधीन होती , यानुसार आता राज्य शासनांकडून पुढीलप्रमाणे निर्णय घेण्यात आलेला आहे .
राज्य शासनांच्या निबंधक संस्था कार्यालयातील गट ब ( यांमध्ये अराजपत्रित अधिकारी ) , गट क आणि गट ड कर्मचारी यांचे वयाच्या 50/55 व्या वर्षापलीकडे अथवा शासन सेवेच्या 30 वर्षानंतर सेवा पुनर्विलोकनानंतर मुदतपुर्व सेवानिवृत्ती निर्णयाविरुद्धच्या अभिवेदनावर विचार करणेकामी राज्य शासनांकडून अभिवेदन समितीची स्थापना करण्यात आलेली आहे .
सदर समितीमध्ये निबंधक भागीदारी संस्था , महाराष्ट्र राज्य मुंबई हे अध्यक्ष असणार असून , धर्मादाय उप आयुक्त , महाराष्ट्र राज्य मुंबई ( मुख्यालय ) हे सदस्य तर सहायक निबंधक भागीदारी संस्था मुंबई / पुणे / छत्रपती संभाजीनगर / नागपुर हे सदस्य सचिव असणार आहेत .
या संदर्भात विधी व न्याय विभागांकडून दिनांक 18 डिसेंबर 2023 रोजी निर्गमित करण्यात आलेला सविस्तर शासन निर्णय (GR) पुढीलप्रमाणे पाहु शकता ..
आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.