लाईव्ह मराठी पेपर , प्रणिता पवार : महाराष्ट्र शासनाचे सध्या पावसाळी अधिवेशन सुरू आहे , या अधिवेशनामध्ये राज्य कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीच्या वया संदर्भात तारांकित प्रश्न उपस्थित केला असता , राज्य शासनाकडून महत्त्वपूर्ण उत्तर देण्यात आले आहेत . या उपस्थित तारांकित प्रश्नावर श्री . अजित पवार यांनी उत्तर दिले आहेत ..
राज्यातील कर्मचाऱ्यांची बऱ्याच दिवसापासून सेवानिवृत्तीचे वय केंद्र सरकार , त्याचबरोबर इतर 25 राज्यांनी लागू केल्याप्रमाणे 58 वर्षावरून साठ वर्ष करणे संदर्भात मोठी मागणी करण्यात आलेली आहे . या मागणीवर राज्य शासनाकडून दिनांक 24 जुलै 2023 रोजी विधानपरिषद मध्ये सदस्याने तारांकित प्रश्न उपस्थित केला असता या प्रश्नांचे उत्तर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुढीप्रमाणे उत्तर दिले आहेत ..
राज्यातील शासकीय / अधिकारी कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय 58 वर्षावरून साठ वर्ष करणे संदर्भात विधान परिषद सदस्य विलास पोतनीस , श्री सुनील शिंदे यांनी तारांकित प्रश्न क्र .18942 विचारला असता , राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांनी उत्तर दिले आहे .
यामध्ये नमूद करण्यात आली आहे की , राज्यातील शासकीय कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय 58 वर्षावरून साठ वर्षे करण्याबाबतची मागणी स्थानिक लोकप्रतिनिधींनी माननीय मुख्यमंत्री महोदयाकडे लेखी निवेदनाद्वारे दिनांक 17 मे 2023 रोजी वा त्यानुसार केली आहे , हे खरे आहे काय असे प्रश्न उपस्थित केला असता अजित पवार यांनी होय हे खरे आहे असे उत्तर दिले आहे .
त्याचबरोबर हे खरे असल्यास उक्त प्रकरणी मागणीच्या अनुषंगाने राज्यातील शासकीय कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय 58 वर्षांवरून साठ वर्षे करणे बाबत कोणती कार्यवाही करण्यात येत आहे , असा प्रश्न उपस्थित केला असता श्री. अजित पवार यांनी उत्तर दिले की सदर मागणीबाबत अद्याप शासन स्तरावर निर्णय घेण्यात आलेला नाही , असे नमूद करण्यात आले आहेत.
या संदर्भात राज्य शासनाच्या विधान परिषदेमध्ये उपस्थित केलेला तारांकित प्रश्न (क्रमांक 18 942) व उत्तर पुढील प्रमाणे पाहू शकता ..

आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेतर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच पेन्शनधारक – कुटुंब निवृत्तीवेतनधारक असाल तर व्हाट्सअप ग्रुप मध्ये जॉईन व्हा !
- एकस्तर वेतनश्रेणीचा लाभ केवळ विशिष्ट पदांनाच ; इतर पदांना वेगळे नियम !
- यापुढे आता केंद्र सरकारकडून सेंद्रिय शेतीमाल करीता नवी प्रणाली लागु ; जाणून घ्या सविस्तर !
- नदीजोड प्रकल्पाचा पश्चिम महाराष्ट्रातील 03 जिल्ह्यांना तर मराठवाड्यातील 06 जिल्ह्यांना मिळणार लाभ !
- रजा प्रवास सवलत अंतर्गत कर्मचाऱ्यांना मोफत प्रवासाची सुविधा ; या सार्वजनिक वाहनातुन करता येणार मोफत प्रवास !
- आठवा वेतन आयोगात कर्मचाऱ्यांचे वेतन 38 टक्के तर पेन्शन मध्ये 34 टक्क्यांची होईल वाढ !