Spread the love

लाईव्ह मराठी पेपर , संगिता पवार : केंद्र सरकार तसेच देशातील तब्बल 25 राज्य सरकारने केंद्र सरकारच्या धर्तीवर कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय 60 वर्षे करण्यात आलेले आहेत . असे असताना देखिल महाराष्ट्र राज्य सरकारने राज्यातील कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वयांमध्ये वाढ करणेबाबत , अद्याप निर्णय घेण्यात आलेला नाही . यामुळे राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजगी आहे , सेवानिवृत्तीचे वय 60 वर्षे केल्यास कर्मचाऱ्यांना दोन वर्षांची अतिरिक्त सेवेचा लाभ प्राप्त होणार आहे .

सेवानिवृत्तीचे वय वाढविणेबाबत मुख्य सचिव यांचे प्रस्तावाबाबत स्पष्टीकरण : दिनांक 22 जून 2023 रोजी राज्याचे मुख्यसचिव व राजपत्रित अधिकारी महासंघाची बैठक आयोजित करण्यात आलेली होती . या बैठकीमध्ये कर्मचाऱ्यांच्या जुनी पेन्शन , सेवानिवृत्तीचे वय 60 वर्षे करणे अशा विविध मागणीवर सकारात्मक चर्चा करण्यात आली .

राज्यातील शासकीय कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय केंद्र सरकार तसेच इतर 25 राज्य सरकारप्रमाणे 60 वर्षे करण्याच्या मुद्द्यावर मुख्य सचिव यांना विचारले असता , उत्तर देताना सांगितले कि राज्य कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय 60 वर्षे करणे बाबतचा प्रस्ताव राज्य शासनांच्या विचाराधीन असून याबाबत राज्य शासनांच्या वित्त विभागांकडून कार्यवाही करण्यात येईल , असे यावेळी नमुद करण्यात आले .

म्हणजेच सेवानिवृत्तीचे वय 60 वर्षे करणे राज्य शासनांच्या विचाराधीन आहे परंतु याबाबतचा निर्णय लवकरात घेतला जाण्याची शक्यता आहे . कारण पुढील वर्षे विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुका असल्याने , शासनांकडून कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय वाढवून खुष करतील अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे .

सेवानिवृत्तीच्या वयांमध्ये 02 वर्षांची वाढ लागु केली असता , राज्य कर्मचाऱ्यांना अतिरिक्त दोन वर्षांची सेवेचा लाभ मिळणार आहे , ज्यामुळे सेवानिवृत्तीनंतर मिळणाऱ्या पेन्शन रक्कम , सेवानिवृत्ती उपदानाची वाढीव रक्कम मिळणार आहे .

आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *