Spread the love

Live marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ State Employee Retirement Age Increase & Old Pension Scheme New Update News ] : राज्यातील शासकीय कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय 60 वर्षे करणे व सुधारीत पेन्शन योजना लागु करणेबाबत , राज्य शासनांकडून विधानसभा निवडणूकापुर्वीच निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती समोर येत आहे .

राज्य शासनांकडून अर्थसंकल्पीय अधिवेशनांमध्ये राज्यातील कर्मचाऱ्यांना सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजना लागु करण्याची मोठी घोषणा केली आहे , परंतु याबाबत राज्य शासनांकडून अधिकृत्त शासन निर्णय / अधिसूचना निर्गमित करण्यात आलेली नाही . कारण विधानसभेच्या निवडणूका माहे नोव्हेंबर 2024 मध्ये होणार असल्याने , निवडणूकांपूर्वीच याबाबत निर्णय जाहीर करण्यात येणार आहे .

या लोकसभा निवडणूकांमध्ये फायदा व्हावा याकरीता राज्य सरकारकडून सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजना लागु करण्याची घोषणा करण्यात आलेली आहे , परंतु त्याची प्रत्यक्ष अंमलबावणीबाबतचे अधिकृत निर्णय हे विधानसभा निवडणूकांपुर्वी घेण्यात येईल , जेणेकरुन विधानसभा निवडणूकांमध्ये देखिल फायदा होईल . या उद्देशाने राज्य सरकारकडून जुनी पेन्शन मधील लाभासह सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजना लागु करण्यात येणार आहे .

सेवानिवृत्तीचे वय वाढ : पेन्शनच्या मागणीनंतर राज्यातील कर्मचाऱ्यांची मोठी मागणी म्हणजे , सेवानिवृत्तीचे वय 60 वर्षे करणे ही होय , तसेच 58 वर्षे प्रमाणे राज्यातील सेवानिवृत्त होण्याचा आकडा पुढील 2 वर्षांमध्ये अधिक आहे , यामुळे सदर कर्मचाऱ्यांच्या मागणीचा विचार करता सेवानिवृत्तीचे वय वाढविणेबाबत , अधिकृत्त निर्णय विधानसभा निवडणूकापुर्वी घेतला जाण्याची शक्यता आहे .

याबाबतचा प्रस्ताव विधानभेत मांडण्यापुर्वी काही सदस्यांनी सेवानिवृत्तीचे वय वाढविणेबाबतच्या प्रस्तावास विरोध केल्याने , हा प्रस्ताव रखडला गेला . परंतु निवडणूका पुर्वी कर्मचाऱ्यांनी सेवानिवृत्तीचे वय वाढविणेबाबत ,मागणी अधिक रेटून धरल्यास पेन्शन मागणीप्रमाणे , निश्चितच सेवानिवृत्तीच्या वयांमध्ये वाढ होईल .

आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *