Spread the love

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ State Employee Retirement Age Increase News ] : राज्यातील लाखो कर्मचाऱ्यारी सेवानिवृत्तीच्यावय वाढीकरीता प्रतिक्षेत आहेत , याबाबत राज्य सरकारकडून उचित निर्णय घेण्यात येईल , अशी आशा कर्मचाऱ्यांना लागली आहे . यासंदर्भात सद्यस्थितीमध्ये मंत्रालय स्तरावर नेमक्या कोणत्या हालचाली आहे , याबाबत सविस्तर अपडेट पुढीलप्रमाणे जाणून घेवूयात ..

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सेवानिवृत्तीचे वय वाढीबाबत सकारात्मक आश्वासन दिले होते : राज्यातील कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीच्या वय वाढीबाबत सकारात्मक आश्वासन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले होते , याबाबत अर्थसंकल्पिय अधिवेशांमध्ये प्रस्ताव देखिल सादर करण्यात येणार होते , परंतु प्रस्ताव सादर होण्याआधीच काही आमदारांनी यास विरोध दर्शविणारे पत्रव्यवहार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सादर केल्याने ,हा प्रस्ताव प्रलंबित राहिला आहे .

कर्मचारी संघटनांची राज्याचे मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीमध्ये देखिल मुख्य सचिवांनी सांगितले होते , कि राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे याबाबत सकारात्मक असून , याबाबत प्रस्ताव तयार करुन सविस्तर निर्णय घेण्यात येईल असे सांगण्यात आले . जुनी पेन्शन नंतर सर्वात मोठी मागणी म्हणजे सेवानिवृत्तीचे वय 60 वर्षे करणे होय .

सद्य स्थितीत मंत्रालय स्थरावरील अपडेट : सध्य स्थितीमध्ये मंत्रालय स्थरावर याबाबत कोणताही निर्णय घेण्यात आला नाही , शिवाय आता आचार संहिता मुळे अशा प्रकारचे निर्णय देखिल राज्य शासनांस घेता येणार नाहीत . यामुळे सदर सेवानिवृत्तीचे वय वाढीबाबतचा प्रस्ताव आता विधानसभा निवडणुका तोंडावर निकाली काढण्याची शक्यता आहे . कारण निवडणुकांच्या तोंडावर अनेक प्रलंबित प्रश्न मार्गी लागताना दिसून येतात .

देशांमध्ये केंद्र सरकारच्या धर्तीवर इतर 25 राज्य सरकारने सेवानिवृत्तीचे वय हे 60 वर्षे केल्याने , राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांची सेवानिवृत्तीचे वय 60 वर्षे करणेबाबत मागणी होत आहे . जरी राज्य शासनांने सेवानिवृत्तीचे वय वाढीबाबत निर्णय घेतला तरी हा निर्णय पुर्वलक्षी प्रभावाने लागु करता येणार नसल्याने , जे कर्मचारी सेवानिवृत्त होत आहेत , त्यांच्या करीता सेवा वाढीचा लाभ प्राप्त होणार नाही .

सेवानिवृत्तीचे वयांमध्ये वाढ होणे आवश्यक : आजकालच्या स्पर्धेच्या युगांमध्ये 25-28 वर्षापर्यंत तर शिक्षण पुर्ण होते , त्यानंतर नोकरीकरीता स्पर्धेमुळे अनेक कर्मचारी 30-35 वर्षानंतर सेवेत रुजू होतात , यामुळे जे कर्मचारी सेवेत उशिरा लागले आहेत , अशांकरीता सेवानिवृत्तीचे वय वाढीबाबत सकारात्मक विचार होणे आवश्यक  आहे .

आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *